चौंडेश्वरी सहकारी बँकेच्या पुनर्जीवनासाठी शुक्रवारी (१० जून) बोलाविण्यात आलेली विशेष सभाच रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे चौंडेश्वरीचे पुणे जनता सहकारी बँकेत विलीनीकरण निश्चित झाले असून, ही प्रक्रिया ४ जुल रोजी पूर्ण होणार आहे.
१९८२ मध्ये स्थापन झालेली चौंडेश्वरी सहकारी बँक आता इतिहासकालीन बनणार आहे. चौंडेश्वरी बँक दोन वर्षांपूर्वी नुकसानीत गेल्यामुळे ऑगस्ट २०१४ मध्ये रिझव्‍‌र्ह बँकेने आíथक र्निबध लागू केले. त्यानंतर चौंडेश्वरी बँक अन्य बँकेत विलीन करण्याची प्रक्रिया सुरू झाली. गतवर्षी पुणे जनता सहकारी बँकेने चौंडेश्वरी विलीनीकरणाची तयारी दर्शवली. दोन्ही बँकांच्या विशेष सभा होऊन तसा ठरावही मंजूर करण्यात आला.
दरम्यान, जानेवारी २०१६मध्ये चौंडेश्वरी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध पार पडली. नवनिर्वाचित १५ संचालकांपकी ११ संचालक बुलढाणा अर्बन को-ऑप. सोसायटीचे तर ४ संचालक इचलकरंजीचे निवडले गेले. नवीन संचालकांनी चौंडेश्वरी बँकेचे पुनर्जीवन करण्याचे प्रयत्न सुरू केले. त्यासाठी १० जून रोजी विलीनीकरणाचा फेरविचार करण्यासाठी विशेष सभा बोलावली होती, परंतु अचानकपणे ही सभा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे चौंडेश्वरी बँकेचे पुणे जनता बँकेत विलीनीकरण होणार हे निश्चित झाले आहे.