इंडो जर्मन टूल रूम, औरंगाबाद यांच्या सहकार्याने शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील तिन्ही जिल्हय़ांमधील औद्योगिक व्यवस्थेस पूरक मनुष्यबळ पुरवणारा सामंजस्य करार मंगळवारी येथे करण्यात आला.   शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन सभागृहामध्ये विद्यापीठ आणि औरंगाबाद येथील आयजीटीआर या संस्थेमध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या प्रसंगी कुलगुरू प्रा. डॉ. देवानंद िशदे म्हणाले, भविष्यामध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स विद्यापीठामध्ये उभारले जाणार आहे. उद्योग व्यवस्थेनेही कोणत्या क्षेत्रामध्ये कुशल  मनुष्यबळाची आवश्यकता आहे  हे  विशद  करणे  आवश्यक  आहे.  त्यामुळे आपल्या भागातील विद्यार्थ्यांना तशा प्रकारचे प्रशिक्षण उपलब्ध होईल.