mns chief raj thackeray slam uddhav thackeray for his maharashtra tour zws 70 | Loksatta

उद्धव ठाकरे यांचे आता राज्यभर दौरे कसे?; राज ठाकरे यांचा सवाल

मुंबई महापालिका निवडणूक मनसे स्वबळावर लढवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे यांचे आता राज्यभर दौरे कसे?; राज ठाकरे यांचा सवाल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे photo source : loksatta photo

कोल्हापूर : काही दिवसांपूर्वी आजारपणाचे कारण देत मुख्यमंत्रीपदावर असतानाही घरात राहणारे उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्रीपद जाताच लगेचच राज्यभर दौरे कसे सुरू झाले आहेत, असा बोचरा सवाल उपस्थित करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता त्यांच्या प्रकृतीची कारणे कोठे गेली आहेत. त्या वेळी जनतेला उपलब्ध न होणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीविषयी मी टीका केली होती. त्या वेळी बोललो नाही तर त्यांच्या परिस्थितीची चेष्टा केली होती, असे स्पष्टीकरणही ठाकरे यांनी केले. मुंबई महापालिका निवडणूक मनसे स्वबळावर लढवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक विधान केल्याने त्यांना राज्यपालपदावरून हटवावे, अशी मागणी राज्यात विरोधी पक्ष व विविध संघटनांकडून केली जात आहे. याबाबत विचारणा केली असता राज ठाकरे यांनी काही व्यक्तींना पदे मिळाली तरी त्याची पोच येत नाही.

कोठे काय बोलावे हेच त्यांना समजत नाही, अशा शब्दांत कोश्यारी यांच्यावर ताशेरे ओढले. अशांना कोणी स्क्रिप्ट लिहून देते का? विषारी विधाने करण्याने विषवल्ली पसरत आहे, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.

महत्त्वाच्या प्रश्नांवरून लक्ष वळवण्याचा प्रयत्न

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोंम्मई यांनी सीमाप्रश्नी वादग्रस्त विधान केले आहे. याकडे लक्ष वेधले असता राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्र – कर्नाटक सीमा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. असे असतानाही त्याबाबत आत्ताच वादग्रस्त विधान करण्याची प्रवृत्ती कुठून येते?, अशी बोंम्मई यांच्यावर टीका करून महत्त्वाचे प्रश्न ऐरणीवर येऊ नये यासाठी असे वादाचे प्रश्न उपस्थित केले जातात असेही ते म्हणाले.

मराठीतील सर्व कोल्हापूर ( Kolhapur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 06:05 IST
Next Story
जागावाटप अवघड, तर पक्षविस्तार कसा?; कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे चित्र