कोल्हापूर: कोल्हापुरात रस्ते आहेत कि खड्डे, आता बस्स झाले.एक तर काढण्यात आला.कोल्हापूर शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. चांगले, दर्जेदार रस्ते होण्यासाठी लोक रस्त्यावर येत आहेत. सातत्याने आंदोलन होत आहेत. शासन व  महापालिकेचे निष्क्रिय प्रशासन झोपेचे सोंग घेऊन कोल्हापूरकरांना फसवण्याचा धंदा करत आहे.

या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आज ठाकरे सेनेच्या वतीने शहरांमध्ये मोर्चा काढण्यात आला. १०० कोटीचे रस्ते होणार असा गाजावाजा करून मिरजकर तिकटी येथे कामाचा शुभारंभ केला. पण त्याचे पुढे काय झाले हे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट करावे. रस्त्याचा निधी कुठे मुरतो याचा खुलासा केला जावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी रस्ते काम गतीने व्हावे, टक्केवारीचे प्रकरण थांबावे अशी मागणी करत कार्यकर्त्यांनी शंखध्वनी केला. आंदोलनामध्ये उपनेते संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले, सुनील मोदी, अवधूत  साळुंखे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: On behalf of the thackeray sena a march was held in kolhapur cities on the issue of road potholes amy
First published on: 27-02-2024 at 19:28 IST