इचलकरंजी येथील पंचगंगा नदीत आंघोळीसाठी गेले असताना मंगळवारी एकाचा बुडून मृत्यू झाला. नगाप्पा महादेव हरिजन (वय ११, रा. हत्ती चौक) असे मृताचे नाव आहे. नगाप्पा हरिजन, अडवय्या चंदू स्वामी (वय ११, रा. कुडचे मळा), योगेश सुतार (वय ११, रा. रोटरी क्लबजवळ) व अन्य एक (नाव समजू शकले नाही) हे चौघेजण नदीत आंघोळीसाठी गेले होते. या चौघांना पोहायला येत नव्हते. योगेश हा बुडत असताना तीन मित्रांनी वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र तेही पाण्यात बुडू लागले. यावेळी सुरेश चंद्रकांत मराठे यांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे तिघांना वाचविण्यात यश आले.
संग्रहित लेख, दिनांक 9th Jun 2016 रोजी प्रकाशित
पंचगंगा नदीत बुडून एकाचा मृत्यू
इचलकरंजी येथील पंचगंगा नदीत आंघोळीसाठी गेले असताना मंगळवारी एकाचा बुडून मृत्यू झाला.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 09-06-2016 at 04:06 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One drown death in panchganga river