कबनूर येथील महात्मा फुलेनगर मधील अमन फटाका मार्टच्या गोदामामध्ये मंगळवारी स्फोट झाला. यामध्ये मालक परवेझ मुजावर (वय ३५ ) यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी शिवाजीनगर पोलिसांनी भेट देवून पंचनामा केला.
हेही वाचा >>> कोल्हापुरात दुकाने, घरांना भीषण आग;लाखोंचे नुकसान
कबनूर-कोल्हापूर रोडवर फुलेनगर येथे मुजावर यांचा अनेक वर्षांपासून फटाके तयार करण्याचा कारखाना आहे. मुजावर हे आज फटाका गोदाम मध्ये गेले असता आतमध्ये स्फोट झाला. त्यांना बाहेर पडण्यास वेळ न मिळाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
भिंती जमीनदोस्त; पत्रे उडाले स्फोटाची तीव्रता मोठी होती. त्याचा आवाज दूरवर गेला होता. यामध्ये गोदामची इमारतच्या भिंती जमीनदोस्त झाल्या. छताचे पत्रे दुरवर उडून गेले होते. परवेझचा स्वभाव मनमिळावू होता. त्याच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. त्याच्या मागे आई, वडील, पत्नी, एक मुलगा व मुलगी असा परिवार आहे.