विजय पाटकर, प्रताप सुर्वे, विजय कोंडके या माजी अध्यक्षांचे कडवे आव्हान परतवून लावत समर्थ पॅनेलच्या मेघराज राजेभोसले यांनी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची सत्ता प्राप्त केली. समर्थ पॅनेलला १४ पकी १२ जागा मिळाल्या आहेत.
विजय पाटकर, मेघराज राजेभोसले, पूजा पवार, विजय कोंडके, माजी अध्यक्ष रामदास फुटाणे, ज्येष्ठ संचालक भालचंद्र कुलकर्णी आदी दिग्गज मतमोजणी केंद्रावर ठाण मांडून होते. निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील निकाल तब्बल बारा तासांनंतर जाहीर झाला. त्यामध्ये अभिनेत्री निवेदिता जोशी-सराफ यांच्यासह विद्यमान संचालक मििलद अष्टेकर, अनिल निकम, बाळकृष्ण बारामती यांना पराभवाचा धक्का बसला. महामंडळाच्या सन २०१६-२० या पंचवार्षकि निवडणुकीच्या १४ जागांसाठी क्रियाशील पॅनेल, शक्ती, समर्थ, कोंडके, फाळके, शाहू, संघर्ष, माय मराठी आणि परिवर्तन अशा नऊ पॅनेल आणि अपक्षांसह १२० उमेदवार निवडणुकीच्या िरगणात होते.
महामंडळाच्या इतिहासात या वेळी पहिल्यांदाच सर्वाधिक पॅनेल आणि सर्वाधिक उमेदवारांनी निवडणूक लढविली. निवडणुकीत दोन हजार १३५ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ५४.६४ टक्के मतदान झाले. कोल्हापूर, पुणे आणि मुंबई केंद्रांवरील मतपत्रिकांच्या एकत्रीकरणानंतर गटनिहाय चौदा टेबलांवर मतपत्रिकांची विभागणी करण्यात आली. दुपारी चार वाजता पहिल्या टप्प्यात रंगभूषा, ध्वनिरेखक, अभिनेत्री, निर्मिती व्यवस्था व व्यवस्थापकीय यंत्रणा, कामगार या पाच विभागांतील मतमोजणीला प्रत्यक्षात सुरुवात झाली. रात्री साडेआठ वाजता संबंधित प्रक्रिया पूर्ण झाली. त्यांना विजय पाटकर यांच्या क्रियाशील पॅनेलच्या उमेदवारांनी चांगली लढत दिली. या पाच विभागांत एकूण ६५९ मते बाद झाली. पहिल्या टप्प्यातील निकालात पाच जागांवर बाजी मारल्यानंतर समर्थ पॅनेलच्या समर्थकांनी मेघराज राजेभोसले आणि विजयी उमेदवारांसह मतमोजणी केंद्राबाहेर विजयाच्या घोषणा व गुलालाची उधळण करत जल्लोष केला.
समर्थचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते – वर्षां उसगावकर (अभिनेत्री) ५६६, चताली डोंगरे (रंगभूषा) ५९३, शरद चव्हाण (ध्वनिरेखक) ६२१, संजय ठुबे (निर्मिती व्यवस्था व व्यवस्थापकीय यंत्रणा) ५२०, रणजित (बाळा) जाधव (कामगार) ७५८, मेघराज राजेभोसले (निर्माता गट) ६१४, पितांबर काळे (लेखक गट) ७१८, मधुकर देशपांडे (प्रदर्शन, वितरण गट) ६४९, निकिता मोघे (संगीतनृत्य, पाश्र्वगायन गट) ६०६, धनाजी यमकर (स्थिर चलत छायाचित्रण) ५८९, विजय खोचीकर (संकलन गट), सतीश रणदिवे (दिग्दर्शक गट).
संग्रहित लेख, दिनांक 28th Apr 2016 रोजी प्रकाशित
चित्रपट महामंडळावर मेघराज राजेभोसले यांची सत्ता
समर्थ पॅनेलचा १२ जागी विजय
Written by लोकसत्ता टीम

First published on: 28-04-2016 at 03:30 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Power of megharaj rajebhosale on film corporation