कोल्हापूर : गोकुळमध्ये महायुतीचा अध्यक्ष झाल्याचा आनंद आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांसह गोकुळ दूध संघाची निवडणूक महायुतीच्या माध्यमातून आम्ही सगळेजण एकत्रितपणे लढवणार आहोत. महायुतीत मंत्री असलेले हसन मुश्रीफ हे आमच्यासोबत असतील, असा दावा खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत केला. गोकुळच्या अध्यक्षपदच्या घडामोडीत माझा सहभाग नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाडिक म्हणाले, गोकुळमध्ये आधीच्या सत्ताकाळात किती ठेवी होत्या आणि आता किती आहेत. वासाच्या दुधाच्या मुद्द्याचे राजकारण करून सत्ता मिळवणाऱ्यानी वासाचे दूध किती प्रमाणात लोकांना परत केले हे सांगावे.