कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष, आमदार पी. एन.पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील यांना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सांत्वनपत्र पाठवले आहे.

पी. एन. पाटील यांच्या आकस्मिक निधनाने मला खूप दु:ख झाले आहे. त्यांच्यासारखा जनसेवेसाठी जीवन समर्पित करणारा नेता काँग्रेस परिवाराने गमावला आहे. उपेक्षितांचे जीवन बदलण्याचा निर्धार त्यांच्या राजकारणाला दिशा देणारा ठरला आहे, अशा भावना काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी या सांत्वनपत्रातून भावना व्यक्त केल्या आहेत.

kolhapur district bank board of directors pay tribute to pn patil from Italy
इटलीमध्ये आमदार पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
vishal patil and uddhav thackeray
“उद्धव ठाकरेंना…”, काँग्रेसला पाठिंबा दिल्यानंतर अपक्ष आमदार विशाल पाटलांचं विधान
Bruno dog, MLA PN Patil,
आमदार पी. एन. पाटील यांच्या पाठोपाठ लाडका ब्रुनो श्वान अंतरला; कुत्र्याची अनोखी स्वामीनिष्ठा
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Bihar politics Nitish Kumar and Tejashwi Yadav
“४ जूननंतर नितीश कुमार पुन्हा…”, तेजस्वी यादव यांच्या दाव्यामुळे बिहारच्या राजकारणात ट्विस्ट
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
hasan mushrif, samarjeet Ghatge
कागलमध्ये मंत्री हसन मुश्रीफ – समरजित घाटगे यांनी दंड थोपटले

आणखी वाचा-प्रदुषण मंडळाकडुन इचलकरंजीतील सायझिंग उद्योग बंद पाडण्याचा घाट; सायझिंगधारकांच्या बैठकीत आरोप

सांत्वन पत्रामध्ये म्हटले आहे कि, दिवंगत आमदार पी. एन. पाटील यांच्या काँग्रेस विचारधारेशी असलेल्या तीव्र बांधिलकीने त्यांच्या राजकारणाला आकार दिला. समाजात शांतता आणि सहिष्णुतेचा आदर्श साजरा करण्यासाठी त्यांनी तीस वर्षांहून अधिक काळ सद्भावना दौडचे आयोजन केले. पक्षासाठी विशेषत: कोल्हापुरातील संघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी दिलेले अतुलनीय योगदान स्मरणात राहील. मी तुझ्या दु:खाची कल्पना करू शकतो. माझ्या मन:पूर्वक संवेदना स्वीकारा, असे गांधी यांनी अशोक संदेशांमध्ये म्हटले आहे.