कोल्हापूर : राज्यातील महानगरांमध्ये होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगोत्सव साजरा केला जात असला तरी पश्चिम महाराष्ट्रासह ग्रामीण भागामध्ये पाचव्या तिथीला रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. यंदा शनिवारी रंगपंचमी आली असताना आतापासून उत्साह दिसत आहे. यानिमित्त विविध प्रकारच्या साहित्यांनी कोल्हापूरची बाजारपेठ सजली असून  रंग, पिचकारी खरेदीसाठी गर्दी होत आहे.

होळी, धुळवड नंतर तीन दिवसावर आलेल्या रंगपंचमी सणाचा उत्साह सगळीकडे दिसायला लागला आहे. बाजारपेठेत बालगोपाळांसह नागरिकांची रंग, पिचकारी खरेदी करण्यासाठी लगबग सुरु झाली आहे. बाजारपेठेत विविध प्रकारचे नैसर्गिक रंग, स्प्रे, लहान मुलांसाठी विविध प्रकारच्या पिचकाऱ्या दाखल झाल्या आहेत. मिनी थंडर व थंडर या प्रकारच्या स्प्रेला सर्वाधिक मागणी असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. पिचकाऱ्यांना लहान मुलांची पसंती मिळत आहे. १०० पासून ४०० रुपयांपर्यंत पिचकाऱ्या उपलब्ध आहेत. रंगाचे पोते १२५ ते २५० रुपयांपर्यंत मिळत आहे. टॉपगन, वॉटर टँक व पिचकारी ५० ते ५०० रुपये अशा किंमतीत उपलब्ध असून आतापासूनच ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी होत आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rangpanchami on saturday in rural areas of the state including kolhapur amy
First published on: 26-03-2024 at 20:03 IST