कोल्हापूर : कोल्हापूरचे जल वैभव असलेल्या रंकाळा तलावाच्या संवर्धन, सुशोभीकरणाच्या कितीही बाता मारल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात हे काम थंड पडलेले आहे. या कामाच्या ठिकाणी ना कामगारांची उपस्थिती ना आवश्यक बांधकाम साहित्य अशी दुरवस्था बुधवारी दिसून आली. परिणामी आयुक्त के. मंजू लक्ष्मी यांनी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांना कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा शासन आणि महापालिकेच्या ढिसाळ कारभाराचे दर्शन घडले.

हेही वाचा – पंचगंगा नदी प्रदूषणात आढळून आलेले मुद्दे उच्च न्यायालयाच्या याचिकेवेळी सादर करणार – दिलीप देसाई

हेही वाचा – हज यात्रेकरूंच्या समस्या निवारणासाठी ॲपची निर्मिती; नव्या उपक्रमाने भाविकांना दिलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महापालिकेच्यावतीने राज्य शासनाच्या व जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून रंकाळा तलावाचे संवर्धन व सुशोभीकरण करण्यात येत आहे. रंकाळा तलाव कोल्हापुरातील नागरीकांची व पर्यटकांच्या विरंगुळ्याचे, जिव्हाळ्याचे ठिकाण आहे. या सुशोभिकरणामुळे तलावाला गतवैभव प्राप्त होणार असले तरी कामाची कुर्मगती पाहता अपेक्षाभंग होत आहे. हे काम संथगतीने सुरु असल्याच्या नागरीकांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे रंकाळा तलाव येथे सुरु असलेल्या या कामाची आज दुपारी प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी अचानक तपासणी केली. यावेळी त्यांना या ठिकाणी ठेकेदारामार्फत पूर्ण क्षमतेने कामे सुरु नसल्याचे निदर्शनास आले. ठेकेदाराचे कोणीही कामगार उपस्थित नव्हते. कोणतीही यंत्रसामुग्री उपलब्ध नव्हती. प्रशासकांनी नाराजी व्यक्त करुन हे काम विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना ठेकेदारास दिल्या. तसेच, कामामध्ये प्रगती नसल्याने शहर अभियंता सरनोबत यांना प्रशासकांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.