कोल्हापूर : शरद पवार यांच्यावर बोलताना खासदार संजय मंडलिक सारख्या बाजारबुंग्यांनिया भान ठेवले पाहिजे. अन्यथा त्यांना प्रतीउत्तर दिले जाईल, असा इशारा शरद पवार गटाचे प्रवक्ते प्रशांत जगताप यांनी दिला आहे.
लोकसभा निवडणुकीला शाहू महाराज यांना माझ्या विरोधात उभे करणे हे शरद पवार यांचे षडयंत्र आहे, असा आरोप शिंदे सेनेचे खासदार संजय मंडलिक यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला.
आणखी वाचा- शाहू महाराज यांना माझ्या विरोधात उभे करणे हे शरद पवार यांचे षडयंत्र – संजय मंडलिक
या टीकेला शरद पवार राष्ट्रवादी गटातून प्रत्त्युत्तर देण्यात आले आहे. पक्षाचे प्रवक्ते प्रशांत जगताप म्हणाले, शरद पवार व शाहू महाराज यांचे संबंध दीर्घ काळापासून असून दोघांनीही मोठे सामाजिक कार्य केले आहे. लोकसभा निवडणूक लढवणे हा शाहू महाराज यांच्या वैयक्तिक निर्णय आहे. त्यामध्ये शरद पवार यांना ओढण्याचे संजय मंडलिक यांना काहीच कारण नव्हते. पराभव समोर दिसू लागले असल्याने संजय मंडलिक हे बालिश विधान करत आहेत. शरद पवार यांच्यावर बोलताना मंडलिक सारख्या बाजारबुंग्यांनिया भान ठेवले पाहिजे. अन्यथा त्यांना प्रतीउत्तर दिले जाईल, असेही जगताप म्हणाले.