कोल्हापूर : वीटभट्टी,ऊसतोड कामगारांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या ‘अवनि’ संस्थेने अल्पावधीत कार्यविस्तार केला आह़े  या मुलांना स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे बळ देण्यासाठी संस्थेला आर्थिक बळ हवे आह़े

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर, सांगली, सातारा परिसर हा साखरपट्टा म्हणून ओळखला जातो. येथे ऊसतोड तसेच वीटभट्टी कामगारही मोठय़ा संख्येने असतात. गरीब कामगारांची मुलेही तेथेच मजुरी करतात. शिक्षणापासून दुरावलेल्या मुलामुलींसाठी ‘अवनि’ने कामाच्या ठिकाणीच शाळा सुरू केल्या. संस्थेने अशा हजारो मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. पारंपरिक शिक्षणाबरोबरच या मुलांना व्यवसायपूरक प्रशिक्षणही दिले जाते.

 ‘अवनि ने मुलींसाठी सुमारे १२ हजार चौरस फुटांची इमारत उभारली आहे. संस्थेत मुलींचा ओघ वाढत असून ८२०० चौरस फुटांच्या विस्तारित प्रकल्पाचे काम प्रलंबित आह़े  त्यात ग्रंथालय, सुसज्ज प्रशिक्षण केंद्र, स्वयंपाकगृह, भोजन कक्ष, अभ्यासिका, भांडार, स्नानगृह अशा विविध सुविधा पुरवल्या जाणार आहेत. सुमारे १ कोटी ३० लाख रुपये खर्चाच्या या प्रकल्पासाठी दानशूरांनी आर्थिक मदत करावी, असे आवाहन ‘अवनि च्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी केले आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sarva karyeshu sarvada information about avani charitable organization zws
First published on: 05-09-2022 at 04:03 IST