कबनूर येथील एका शाळकरी मुलाचा शुक्रवारी पंचगंगा नदीत पोहताना बुडून मृत्यू झाला. सानौला इम्रान मुजावर (रा सनी कॉर्नर) असे मुलाचे नाव आहे. कबनूर हायस्कूलमध्ये हा मुलगा इयत्ता दहावीमध्ये  शिकत होता. चंदूर पंचगंगा नदीत पोहन्यासाठी गेला असता तो बुडून मृत्युमुखी पडला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कबनूर (ता. हातकणंगले) गावातील सानौला इम्रान मुजावर हा मुलगा दिवाळीची सुट्टी लागलायने आई-वडिलांना मित्रकडे जातो असे सांगून पंचगंगा नदीत पोहण्यासाठी गेला. नदीच्या पाण्याचा अंदाज आला नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. सानौलाच्या आई-वडिलांनी त्याची शोधाशोध केली पण तो कुठेही मिळाला नसल्याने शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे हरवलेल्याची तक्रार नोंदवली होती. आज सकाळी काही ग्रामस्थांना बालकाचा मृतदेह नदीत तरंगत असताना दिसला. ग्रामस्थांनी मृतदेह नदीतून बाहेर काढला असता त्याची माहिती काढण्याचा प्रयत्न केला.  त्यांना काही माहिती मिळाली नसल्याने शिवाजीनगर पोलिसांना सांगितले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सानौला याच्या पालकांना बोलावले असता त्यांनी मृतदेह पाहून आक्रोश केला.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: School student drown in kolhapur
First published on: 29-10-2016 at 02:11 IST