कोल्हापूर : इचलकरंजीचे माजी आमदार अशोकराव जांभळे यांचे चिरंजीव आणि तत्कालीन नगरपालिकेतील विविध समित्यांचे सभापदी, विविध संस्थांचे संचालक नितीन जांभळे यांचे रविवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या अंत्ययात्रेत राजकीय, सामाजिक, क्रीडा यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरीक सहभागी झाले होते.

अत्यंत तरुण वयात नगरसेवक झालेले नितीन जांभळे यांनी इचलकरंजी नगरपालिकेत बांधकाम सभापती, पाणी पुरवठा सभापती पद तसेच विविध सहकारी संस्थेत पदाधिकारी म्हणून यशस्वी जबाबदारी सांभाळली होती. त्यांना क्रिकेट खेळण्याचा मोठा छंद होता. सध्या त्यांच्याकडे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या युवा जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारी होती.

आणखी वाचा- केजरीवालांच्या समर्थनार्थ कोल्हापुरात आपतर्फे सामूहिक उपोषण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हृदविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. निधनाचे वृत्त समजताच त्यांच्या निवासस्थानी आणि आयजीएम रुग्णालयासमोर राजकीय, सामाजिक, क्रीडा यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरीकांनी गर्दी केली होती. सायंकाळी काढलेल्या त्यांच्या अंत्ययात्रेत विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरीक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.