महाराष्ट्रासमोर दुष्काळाचे मोठे संकट आहे. यापूर्वी कायद्यात पूर्वी दुष्काळ हा शब्द होता त्यामुळे दुष्काळ जाहीर केल्यावर राष्ट्रीय आपत्ती निधीतून मदत मिळत असे, त्याचप्रमाणे सर्व यंत्रणा राबत असे. परंतु नोकरशाहीला याचा त्रास होत असल्याने दुष्काळ हा शब्द काढून त्या ऐवजी टंचाई हा शब्द त्यांनी वापरण्यास सुरुवात केली. दुष्काळाऐवजी टंचाई हा शब्द कोणी बदलला, का बदलला याची चौकशी व्हावी व पुन्हा दुष्काळ हा शब्द वापरावा अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केली.
खा.भोसले पुढे म्हणाले, कमी होणाऱ्या पावसामुळे दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. दुष्काळाचा सामना करण्यासाठी निधीची तसेच यंत्रणेची अडचण केवळ दुष्काळाऐवजी टंचाई हा शब्द बदलल्याने होत आहे. या बाबत आपण मुख्यमंत्री तसेच पंतप्रधानांना भेटणार आहोत. त्याच प्रमाणे हा शब्द पुन्हा दुष्काळ असा झाला तर रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळेल. भ्रष्टाचाराबाबत बोलताना ते म्हणाले, केंद्रात बऱ्याच वर्षांनंतर पूर्ण बहुमत असलेले सरकार आले आहे. जनतेची इच्छा आहे आता भ्रष्टाचार करण्याऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. विकास न होणे, योजना अपूर्ण रहाणे, सहाकर क्षेत्रात अडचणी येणे यांसह विविध प्रश्नांचे मूळ हे भ्रष्टाचारात आहे त्यामुळे सर्व प्रथम भ्रष्टाचार होणे थांबले पाहिजे. सहकार क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार असून संस्था चालवणारे नेते मंडळी सहकार हे खासगी मालमत्ता असल्यासारखे वागतात त्यामुळे अन्यायाच्या विरोधा आवाज उठवणे हे माझे काम आहे. माझा पक्ष जनता आहे असे ते म्हणाले. सत्तेसाठी लोचटपणा करणारा मी नाही त्यामुळे जनतेने मला दुसऱ्यांना विक्रमी मतांनी निवडून दिले आहे. सर्व पक्ष त्यांच्या सिध्दांतात धोरणे चांगली असतात मात्र काही जणांत विकृती आणि संकुचित प्रवृत्ती असतात त्यामुळे पक्ष बदनाम होतो असे खा.भोसले म्हणाले.
दुष्काळ याच शब्दाचा वापर व्हावा; खासदार भोसले यांची मागणी
महाराष्ट्रासमोर दुष्काळाचे मोठे संकट आहे. यापूर्वी कायद्यात पूर्वी दुष्काळ हा शब्द होता त्यामुळे दुष्काळ जाहीर केल्यावर राष्ट्रीय आपत्ती निधीतून मदत मिळत असे, त्याचप्रमाणे सर्व यंत्रणा राबत असे.
Written by लोकसत्ता टीम
आणखी वाचा
First published on: 04-04-2016 at 01:10 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Use drought word demand of udayanraje bhosale