कोल्हापूर : संपूर्ण देशामध्ये कोठेही काँग्रेस पक्ष एमआयएम पक्षाचा पाठिंबा घेत नाही. पण शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, ताराराणी यांचा वारसा सांगणाऱ्या कोल्हापूरमध्येच या जिहादी प्रवृत्तीला का पोसत आहेत. यामागे कोणते षडयंत्र दडले आहे, असा प्रश्न बुधवारी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी उपस्थित केला.

कोल्हापूर जिल्ह्यातील हिंदुत्वाची संघटना हा डाव मोडीत काढतील. निवडणुकीत रस्त्यावर उतरून काँग्रेस विरोधात प्रचार करून हिंदुत्वाची ताकद दाखवून दिली जाईल. हिंदू जनमत जागृत करून काँग्रेसला जिल्ह्यातून हद्दपार केले जाईल, असा इशारा यावेळी हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष दीपक देसाई, शिवसेना उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे आशिष लोखंडे, विश्व हिंदू परिषदेचे कुंदन पाटील, हिंदू जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, विश्व हिंदू परिषदेचे अनिल दिंडे, हिंदू एकताचे गजानन तोडकर, हिंदू महासभेचे संदीप सासणे, महाराज प्रतिष्ठानचे निरंजन शिंदे, बजरंग दलाचे अक्षय ओतारी, चिंतामणी फाउंडेशनचे सोहम कुराडे, अभिजीत पाटील, अर्जुन आंबी, योगेश केरकर, सुनील सामंत आदींनी दिला आहे.

हेही वाचा – वारसा नको तर विकासावर बोलूया; संजय मंडलिक यांचे शाहू महाराजांना थेट खुल्या चर्चेचे निमंत्रण

आज पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितले की, कोल्हापूरच्या गादीचे वारस शाहू छत्रपती लोकसभा निवडणूक लढवत आहेत. ते शिवछत्रपतींच्या गादीचे वारसदार असल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची टीका टिपणी करणे टाळले आहे. परंतु एमआयएम पक्षाचा पाठिंबा शाहू महाराज यांनी स्वीकारला आहे. हा कोल्हापूरच्या इतिहासातील काळा दिवस आहे. देश विघातक पक्षाचा पाठिंबा स्वीकारून या प्रवृत्तीला राजाश्रय कशासाठी दिला जात आहे. या घटनेमुळे ही प्रवृत्ती जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश करीत आहे. ही कीड पसरण्याआधीच तिला इथेच रोखावे. उद्या कोल्हापुरात धर्मांध जिहादी तयार झाले तर याला सर्वस्वी आपण जबाबदार असाल. एका निवडणुकीकरिता कोल्हापूरकरांचे भविष्य अंधारात लोटू नका. ओवेसी प्रवृत्तीला बळ देऊ नका, असा इशारा यावेळी देण्यात आला.

हेही वाचा – वारसा नको तर विकासावर बोलूया; संजय मंडलिक यांचे शाहू महाराजांना थेट खुल्या चर्चेचे निमंत्रण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्य शासनाने छत्रपती संभाजीनगर नामांतर करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा या पक्षानेच विरोध दर्शवला होता. आमचे आराध्य दैवत संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करणाऱ्या जातीवादी लोकांना देशद्रोही म्हटले पाहिजे. असे असताना करवीर संस्थांनचे छत्रपती शिवाजी – शाहू महाराज यांचे आताचे वंशज लोकसभा निवडणुकीत त्यांचा पाठिंबा स्वीकारतात, ही गोष्ट कोणत्याही शिवभक्ताला पटणारी नाही. त्यामुळे अशा प्रवृत्तीला काँग्रेस का पोसत आहे. यामागे काय षडयंत्र आहे, याचा खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.