कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीची मतमोजणी अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली असताना निकालाची कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. मतमोजणीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. विजय आपलाच होणार असा दावा करीत महायुती – महाविकास आघाडीचे कार्यकर्ते गुलाल उधळण्यासाठी आतुर झाले आहे.

लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला मंगळवारी सकाळी आठ वाजता सुरुवात होणार आहे. प्रथम टपाली मतमोजणी होणार असून त्यानंतर ईव्हीएम मतमोजणी अर्ध्या तासाने सुरू होणार आहे. जिल्ह्यात ६८६ कर्मचारी नियुक्त केले असून दहा टक्के अतिरिक्त कर्मचारी आहेत.

हेही वाचा – VIDEO : कोल्हापुरातही भरधाव मोटारीने आठ जणांना उडवले, तिघांचा मृत्यू

व्हीव्हीपॅटद्वारे मतमोजणी

दोन्ही लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी १४ टेबलवर होणार आहे. ईव्हीएम व टपाली मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पाच व्हीव्हीपॅटद्वारे मतमोजणी करण्यात येणार आहे.

हेही वाचा – विजेच्या स्मार्ट प्रीपेड मीटरला नकार; सध्याच्या पोस्टपेड मीटर्स जोडण्या चालू ठेवण्याची मुख्यमंत्र्यांकडे इंडिया आघाडीची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पावसाच्या शक्यतेची दखल

मतमोजणी केंद्रात आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या असून त्याची जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी पाहणी केली. वादळी पावसाची शक्यता गृहीत धरून उपाययोजना कराव्यात, अशी सूचना त्यांनी केली.