सूत खरेदी व्यवहारात पावणे दोन कोटीचा अपहार केल्याप्रकरणी इचलकरंजीतील बडा सुत व्यापारी पंकज पुष्पक अग्रवाल व प्रवीण पुष्पक अग्रवाल या दोघांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय पियुष पंकज अग्रवाल, मयूर पंकज अग्रवाल, पुष्पक अग्रवाल वप्रीतेश शहा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गोपीकिशन हरिकिशन डागा यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे.

हेही वाचा >>> कोल्हापूर जिल्हा लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची आढावा बैठक, अजित पवारांनी उपटले नेत्यांचे कान; नेमकं काय घडलं?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गोपीकिशन डागा ( ४४,रा. प्रकाश लाईट हाऊस समोर इचलकरंजी) हे सूत खरेदी विक्री व्यवसाय करतात. त्यांच्या श्री हनुमान यार्न सिंडिकेट व श्रीहरी सिंटेक्स प्रायव्हेट लिमिटेड या फर्म आहेत. या फर्ममधून पियुष टेक्स्टाईलच्या अग्रवाल कुटुंबीय सुत खरेदी करत होते. सुरुवातीच्या काळात सुत खरेदी वेळेवर देऊन फिर्यादीचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर सुतमालाच्या बिलापोटी यांनी एनइएफटी केली असल्याचे सांगून फिर्यादीस यूटीआर नंबर पाठवला जात होता. फिर्यादी डागा यांनी बँकेत जाऊन यूटीआर नंबरची खात्री केली असता तो बोगस व बनावट असल्याचे निदर्शनास आले. अग्रवाल हे बोगस इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तयार करत होते. त्याद्वारे त्यांनी फिर्यादीची १ कोटी ८७ लाख रकमेचा अपहार केला होता. ही थकीत रक्कम मागण्यासाठी डागा गेले असता पंकज अग्रवाल व पियुष अग्रवाल तसेच अन्य आरोपींनी पैसे देणार नाही. काय करायचे ते कर. पुन्हा आल्यात जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली. या फिर्यादीच्या आधारे दोघांना अटक करण्यात आली आहे असल्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी बुधवारी सांगितले.