भारताविरुद्ध कसोटी मालिका गमावल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोरील अडचणींमध्ये अधिकच वाढ होताना दिसत आहे. आफ्रिकेचा सलामीवीर एडन मार्क्रम उजव्या मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे अखेरची कसोटी खेळू शकणार नाहीये. १९ ऑक्टोबरपासून रांचीच्या मैदानात अखेरचा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. विशाखापट्टणम कसोटीपाठोपाठ पुणे कसोटीतही भारताने विजय मिळवत मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यात फलंदाजीदरम्यान मार्क्रमला दुखापत झाली होती. यानंतर CT scan केल्यानंतर मार्क्रमच्या उजव्या मनगटालाच्या हाडाला दुखापत झाल्याचं दिसून आलं. ज्यामुळे अखेरच्या कसोटी सामन्यात मार्क्रम खेळू शकणार नाहीये. पुढील उपचारांसाठी मार्क्रम मायदेशी परतणार आहे, त्यामुळे तिसऱ्या कसोटीसाठी कोणत्या खेळाडूला अंतिम संघात जागा मिळते आणि अखेरच्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ कसा खेळतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.