19 September 2018

News Flash

जोकोव्हिच, मरे अंतिम फेरीत

महिलांमध्ये गार्बिनसमोर सेरेनाचे आव्हान

महिलांमध्ये गार्बिनसमोर सेरेनाचे आव्हान
कारकीर्दीत ग्रँड स्लॅम विजयांचे वर्तुळ पूर्ण करण्यासाठी आतूर असलेला नोव्हाक जोकोव्हिच ऐतिहासिक जेतेपदापासून अवघ्या एका विजयाच्या अंतरावर आहे. फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत जोकोव्हिचने नवोदित डॉमिनिक थिइमचा धुव्वा उडवत अंतिम फेरीत धडक मारली. अन्य लढतीत अँडी मरेने गतविजेत्या स्टॅनिलॉस वॉवरिन्काचे आव्हान संपुष्टात आणत अंतिम फेरी गाठली. आता रविवारी जोकोव्हिच आणि मरे या तुल्यबल प्रतिस्पर्धीमध्ये जेतेपदासाठी मुकाबला रंगणार आहे. महिलांमध्ये जेतेपदासाठी गार्बिन म्युग्युरुझासमोर जागतिक क्रमवारीत अव्वल आणि अव्वल मानांकित सेरेना विल्यम्सचे आव्हान आहे.
जोकोव्हिचने डॉमिनिक थिइमचा ६-२, ६-१, ६-४ असा धुव्वा उडवला. उपांत्य फेरीतील अन्य लढतीत द्वितीय मानांकित मरेने स्टॅनिसलॉस वॉवरिन्काला ६-४, ६-२, ४-६, ६-३ असे नमवले.
गतविजेत्या सेरेनाला नेदरलँड्सच्या किकी बर्टन्सने प्रत्येक गुणाकरिता झुंजविले. सेरेनाने हा सामना ७-६ (९-७), ६-४ असा जिंकला.
गार्बिनने समंथाला ६-२, ६-४ असे सहज हरविले. महिलांच्या दुहेरीत रशियाच्या एकतेरिना माकारोवा व एलिना व्हेसनिना जोडीने अंतिम फेरी गाठली. उपांत्य फेरीतील सरळ लढतीत त्यांनी बार्बरा क्रॅजिसोवा व कॅटरिना सिनियाकोवा यांना ६-४, ६-२ असे पराभूत केले. पुरुषांच्या दुहेरीत मार्क लोपेझ व फेलेसियानो लोपेझ या स्पॅनिश जोडीने उपांत्य सामन्यात इव्हान डोडिग व मार्सेलो मिलो यांच्यावर ६-३, ३-६, ७-५ असा निसटता विजय नोंदवला.

HOT DEALS
  • Sony Xperia XZs G8232 64 GB (Ice Blue)
    ₹ 34999 MRP ₹ 51990 -33%
    ₹3500 Cashback
  • Honor 7X 64 GB Blue
    ₹ 15590 MRP ₹ 17990 -13%

पेस-हिंगिस अजिंक्य; सानिया-डोडिग उपविजेते
चिरतरुण लिएण्डर पेस आणि मार्टिना हिंगिस जोडीने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील मिश्र दुहेरीच्या अंतिम लढतीत जेतेपदावर नाव कोरले. अंतिम लढतीत पेस-हिंगिस जोडीने सानिया मिर्झा आणि इव्हान डोडिग जोडीवर ४-६, ६-४, १०-८ अशी मात केली. पुरुष दुहेरीत झटपट गाशा गुंडाळावा लागलेल्या पेसने मिश्र दुहेरीत जेतेपदावर नाव कोरत रिओ ऑलिम्पिकसाठी सज्ज असल्याचे सिद्ध केले. कारकीर्दीत मिश्र दुहेरी प्रकारात ग्रँड स्लॅम विजयांचे वर्तुळ पूर्ण करण्यासाठी पेसला फ्रेंच खुल्या स्पर्धेत जेतेपदाची आवश्यकता होती. अंतिम लढतीत पेसने हिंगिसच्या साथीने खेळताना पहिला सेट गमावला, मात्र त्यानंतर सारा अनुभव पणाला लावत बाजी मारली. मिश्र दुहेरीचे पेसचे कारकीर्दीतील हे दहावे तर एकूण अठरावे ग्रँड स्लॅम जेतेपद आहे. पेस-हिंगिस जोडीने एकत्रित खेळताना चार ग्रँड स्लॅम जेतेपदांची कमाई केली आहे.

First Published on June 4, 2016 3:38 am

Web Title: andy murray beats stan wawrinka to reach his first french open final