ऑस्ट्रेलियन खुल्या ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेची मुख्य फेरी गाठण्यात अंकिता रैना सहाव्यांदा अपयशी ठरली. बुधवारी पात्रता स्पर्धेच्या अंतिम फेरीत सर्बियाच्या ओल्गा डॅनिलोव्हिचने तिचा पराभव केला.
दुबईत महिला एकेरीच्या पात्रता फेरीचा अंतिम सामना जवळपास दोन तास रंगला. ओल्गाने ६-२, ३-६, ६-१ अशा फरकाने अंकिताला नामोहरम केले.
पुरुष एकेरीच्या पात्रता फेरीतील पहिल्याच सामन्यात रामकुमार रामनाथनचे आव्हान संपुष्टात आले, तर प्रज्ञेश गुणेश्वर दुसऱ्या फेरीत पराभूत झाला. त्यामुळे आता वर्षांतील पहिल्या ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या एकेरीत सुमित नागलचे एकमेव आव्हान भारताकडून असेल. त्याला थेट प्रवेश देण्यात आला आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 14, 2021 12:15 am