जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय नेमबाजांची धडाकेबाज कामगिरी सुरुच आहे. भारताच्या अंकुर मित्तलने डबल ट्रॅप नेमबाजीत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. १५० पैकी १४० गुणांची कमाई करत अंकुरने सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. स्लोवाकिया आणि चीनच्या प्रतिस्पर्धी खेळाडूने अंकुरला चांगलीच टक्कर दिली, मात्र शूटऑफमध्ये बाजी मारत अंकुरने अव्वल स्थान कायम राखलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याचसोबत अंकुरने सांघिक प्रकारात शार्दुल विहान आणि मोहम्मद असबसोबत कांस्यपदकाची कमाई केली. महिलांमध्ये अंजुम मुद्गील मात्र ५० मी. रायफल थ्री पोजीशन प्रकारात पदकांच्या शर्यतीमधून बाहेर गेली. याचसोबत २५ मी. पिस्तुल प्रकारात भारताची मनू भाकेर दहाव्या स्थानावर फेकली गेली. आतापर्यंत या स्पर्धेतून भारताच्या दोन खेळाडूंनी ऑलिम्पिकचा कोटा मिळवला आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ankur mittal wins double trap gold in issf world championship
First published on: 08-09-2018 at 14:56 IST