अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने बुधवारी संघाचा अनुभवी खेळाडू असगर अफगाणकडे संघाचं नेतृत्व सोपवलं आहे. यापुढे कसोटी, वन-डे आणि टी-२० अशा तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये असगर अफगाणिस्तानचं नेतृत्व करणार आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

२०१९ विश्वचषकाच्या तोंडावर असगर अफगाणची कर्णधारपदावरुन उचलबांगडी करण्यात आली होती. गुलबदीन नैबने विश्वचषकात अफगाणिस्तानंच नेतृत्व केलं. तर कसोटी क्रिकेटमध्ये रेहमत शाह संघाचा कर्णधार होता. मात्र संघाची विश्वचषकातली खराब कामगिरी पाहता, अफगाण क्रिकेट बोर्डाने तिन्ही प्रकारात फिरकीपटू राशिद खानला संघाचं कर्णधार बनवलं.

मात्र यानंतर झालेल्या बैठकीत क्रिकेट बोर्डाने पुन्हा एकदा असगर अफगाणच्या अनुभवाला पसंती देणं ठरवलं आहे. असगरने आतापर्यंत १०० वन-डे सामन्यांमध्ये संघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. वन-डे क्रिकेटमध्ये असगरच्या नावावर एक शतक तर १८ अर्धशतकं जमा आहेत.