कोणत्या फलंदाजाला गोलंदाजी करताना घाबरायचा या प्रश्नाचे उत्तर  भारताचा माजी गोलंदाज आशीष नेहराने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये दिले. या प्रश्नाचे उत्तर देताना नेहराने ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज अॅडम गिलक्रीस्टला गोलंदाजी करताना आपल्याला भिती वाटायची असे नेहरा म्हणाला. इतकेच नाही तर त्याला कशी गोलंदाजी करावी हे पटकण समजत नसे कारण फलंदाजी करताना गिलक्रीस्ट दुसऱ्या ग्रहावरील प्राणी वाटायचा. म्हणून याच दबावाखाली त्याला गोलंदाजी करणे कठीण काम होते असे मत नेहराने व्यक्त केले. लाइव्ह मिंट ला दिलेल्या मुलाखतीमध्ये नेहराने हा खुलासा केला आहे.

कही वर्षांपूर्वी जगातील सर्वोत्तम खेळाडूंचा भरणा असलेल्या त्या काळातील ऑस्ट्रेलिय संघावर नेहराने या मुलाखतीमध्ये स्तृतीसुमने उधळली. त्या काळी म्हणजेच २००० सालांपासून ऑस्ट्रेलियन संघाचा दर्जाच वेगळा होता. २००२-२००८ या सहा वर्षांच्या काळात तर गिलक्रीस्ट वेगळ्याच ग्रहावरचा प्राणी वाटायचा. त्याच काळात खेळलेले जॅक कॅलिस, रिकी पॉण्टींग, ब्रायन लारा आणि विरेंद्र सेहवाग हेही खेळाडू उत्तम खेळ करायचे असे नेहरा म्हणाला.

निवृत्तीचा निर्णय माझा स्वत:चा असून तो मी कोणाच्या दबावाखाली घेतलेला नाही असे स्पष्टीकरण नेहराने दिले. मला वाटतं आता भारतीय संघामध्ये गोलंदाजीची धुरा संभाळण्यासाठी बुमराह आणि भुवनेश्वर ही योग्य जोडगोळी आहे. मागील दोन वर्षांपासून मी आणि बुमराह भारतीय टी-२० संघासाठी गोलंदाजी करायचो. त्यावेळी भुवनेश्वर कधी संघात असायचा तर कधी नसायचा. यंदाच्या आयपीएलमध्ये तर त्याने जबरदस्त खेळ केला. आणि मला हे आवडणार नाही की मी संघात खेळावे आणि भुवनेश्वरने बाहेर बसावे. कोणासाठी जागा करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला नसला तरी तो पूर्णपणे माझाच निर्णय होता हे मात्र खात्रीपूर्वी सांगू शकतो असे नेहरा यावेळी म्हणाला. या संदर्भात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीशीही माझी चर्चा झाली होती. विराटमधील बदलांबद्दल बोलताना एका रात्रीत विराटने हे यश मिळवले नाहीय. त्याने तीन ते चार वर्षे स्वत:च्या शारिरीक क्षमता वाढवल्या. आता त्याची मैदानावरील हलचाल आधीच्या विराटपेक्षा जास्त चपळ असल्याचे निरिक्षणही नेहराने नोंदवले.