तिसऱ्या कसोटीत इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांवर तर भारताचा पहिला डाव १४५ धावांत संपुष्टात आला. इंग्लंडचा कर्णधार जो रुट आणि जॅक लीच यांच्या फिरकीपुढे ‘टीम इंडिया’च्या दिग्गजांनी गुडघे टेकले. रोहित शर्माचा (६६) अपवाद वगळता एकाही भारतीय खेळाडूला चांगली खेळी करता आली नाही. भारताला पहिल्या डावाअखेरीस केवळ ३३ धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरूवातही खराब झाली. अक्षर पटेल आणि रविचंद्रन अश्विन या दोघांनी त्यांच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. त्यात अश्विनने महत्त्वाचा पराक्रम केला.

Ind vs Eng Video: बोल्ड, DRS, बोल्ड…. पाहा अक्षरची नाट्यमय गोलंदाजी

रविचंद्रन अश्विनने इंग्लंडचा अष्टपैलू गोलंदाज बेन स्टोक्स याला पायचीत केलं. बेन स्टोक्ससाठी अश्विन पहिल्यापासूनच कर्दनकाळ ठरला आहे. आतापर्यंत २० डावांपैकी ११ डावात अश्विनने बेन स्टोक्सला माघारी धाडलं. डावखुऱ्या फलंदाजांसाठी अश्विनची फिरकी नेहमीच सापळ्यासारखी भासते. अश्विनने इंग्लंडचा माजी कर्णधार अलिस्टर कूकला ९ वेळा, ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नरला १० वेळा, एड कॉवनला ७ वेळा तर जेम्स अँडरसनला ७ वेळा माघारी धाडलं आहे.

Video: अजब-गजब अंपायर! खेळाडूंनी DRS गमावल्यावर केलं सेलिब्रेशन

दरम्यान, त्याआधी इंग्लंडचा पहिला डाव ११२ धावांत आटोपला. त्यात केवळ झॅक क्रॉलीने अर्धशतक केले. तर अक्षर पटेलने ३८ धावांत ६ बळी टिपले. त्यानंतर भारताचा पहिला डावही स्वस्तात संपला. रोहितच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताला कशीबशी १४५ धावांपर्यंत मजल मारणं शक्य झालं. कर्णधार जो रुटने अवघ्या ८ धावा देत ५ गडी टिपले.