आगामी आशियाई खेळांसाठी हॉकी इंडियाने महिला संघाची घोषणा केलेली आहे. १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबरदरम्या जकार्ता येथे आशियाई खेळांचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला टोकिया ऑलिम्पिकचं थेट तिकीट मिळणार असल्यामुळे ही स्पर्धा मोठ्या फरकाने जिंकण्याचा भारतीय महिलांचा मानस असणार आहे. महिला संघाचे प्रशिक्षक जोर्द मरीन यांनीही राणी रामपालच्या नेतृत्वाखाली संघ सर्वोत्तम कामगिरी असेल असा आत्मविश्वास नोंदवला आहे.

आशियाई खेळांसाठी असा असेल भारताचा संघ –

गोलकिपर – सविता (उप-कर्णधार), रजनी एटीमाप्रु

बचावफळी – दिप ग्रेस एक्का, सुनीता लाक्रा, दिपीका, गुरजीत कौर, रीना खोकर

मधली फळी – नमिता टोप्पो, लिलीमा मिन्झ, मोनिका, उदीता, निक्की प्रधान, नेहा गोयल

आघाडीची फळी – राणी रामपाल (कर्णधार), वंदना कटारिया, लारेमिसामी, नवजीत कौर, नवज्योत कौर