भारतीय वेगवान धावपटू हिमा दास हिने ११ दिवसांत तिसरे सुवर्णपदक जिंकत नवा इतिहास रचला आहे. झेक प्रजासत्ताक येथे सुरु असलेल्या क्लांदो स्मृती अॅथलेटिक्स स्पर्धेत हिमा दासने २०० मीटर शर्यतीत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. जागतिक स्पर्धेत सलग तीन सुवर्णपदक जिंकणारी हिमा पहिली भारतीय धावपटू ठरली आहे. पाच आणि आठ जुलै रोजी हिमा दासने २०० मीटरमध्ये सुवर्णपद जिंकले होते. आता पुन्हा एकदा हिमाने सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला आहे.

वर्ल्ड ज्युनिअर चॅम्पिअन आणि नॅशनल रेकॉर्ड आपल्या नावे असणारी हिमा दास गेल्या काही महिन्यांपासून पाठीच्या दुखण्याने त्रस्त होती. मात्र स्पर्धेत तिने पुनरागन करत ११ दिवसांत भारताला तीन सुवर्णपदकं मिळवून दिली आहेत.