ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाला दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. एकापाठोपाठ एक खेळाडू दुखापतीच्या चक्रात अडकत आहेत. दोन महिन्यापासून ऑस्ट्रेलियात असणाऱ्या भारतीय संघातील आतापर्यंत ९ खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. सिडनी कसोटीमध्ये जसप्रीत बुमराहाला क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्यातच आता मयांक आणि आर. अश्विन यांनाही दुखापत झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.
नेटमध्ये सराव करताना मयांक अगरवालच्या हाताला दुखापत झाली आहे. मयांकची दुखापत गंभीर नसल्याचं बोललं जात आहे. मात्र, सामन्याआधी फिटनेस चाचणीनंतर निर्णाय होणार आहे. तिसऱ्या कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त झालेल्या हनुमा विहारीच्या जागी मयांकला संधी मिळण्याची शक्यता असल्याचं बोललं जातं आहे. मात्र, आता मयांकही दुखापतग्रस्त झाल्यामुळे भारतीय संघाच्या अडचणीत भर पडली आहे.
आणखी वाचा- ICC क्रमवारीत ऋषभ पंतची भरारी, विराट कोहलीची घसरण
तिसऱ्या कसोटी सामन्यात पाचव्या दिवशी साडेतीन तास मैदानात फलंदाजी करत भारतीय संघाचा पराभव टाळणारा अश्विनही दुखापग्रस्त असल्याचं समोर आलं आहे. सिडनी कसोटीनंतर अश्विनचा पाठदुखीचा त्रास वाढला आहे. बुमराह आणि अश्विन बॉर्डर-गावसकर मालिकेत भारताकडून सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज आहेत. आता बुमराहनंतर अश्विनलाही दुखापत झाल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. अश्विनला दोन दिवस पुर्णपणे आराम देण्यात येणार आहे. ब्रिस्बेन कसोटी सामन्याआधी बुमराह, मयांक आगरवाल आणि अश्विन यांची फिटनेस चाचणी होणार आहे. त्यानंतर अंतिम ११ जणांची निवड करण्यात येणार आहे.
आणखी वाचा- लवकरच परतणार..! दुखापतग्रस्त भारतीय खेळाडूची पोस्ट
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात दुखापग्रस्त झालेले खेळाडू –
मोहम्मद शमी, उमेश यादव, के. एल. राहुल, श्रेयस अय्यर, रविंद्र जाडेजा, हनुमा विहारी, जसप्रीत बुमराह, मयांक अगरवाल आणि आर. अश्विन
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 12, 2021 3:20 pm