कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी या गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी कांगारुंना दिलेल्या धक्क्याच्या जोरावर भारताने दुसऱ्या वन-डे सामन्यात बाजी मारली आहे. भारताने विजयासाठी दिलेल्या ३४१ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात फारशी आश्वासक झाली नाही. मात्र यानंतरही ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी दमदार पुनरागमन करत भारताला चांगली झुंज दिली. तरीही मोक्याच्या क्षणी कुलदीप आणि शमीने एकाच षटकात दोन बळी घेत कांगारुंना बॅकफूटवर ढकललं. ऑस्ट्रेलियाचा संघ ३०४ धावांपर्यंतच माजल मारु शकला. ३६ धावांनी सामना जिंकत भारताने या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पहिल्या सामन्यात शतक झळकावणारा डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या सामन्यात झटपट माघारी परतला. यानंतर कर्णधार फिंच आणि स्मिथ यांनी छोटेखानी भागीदारी रचत भारताला झुंज दिली. मात्र रविंद्र जाडेजाने फिंचला माघारी धाडत ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. तरीही ऑस्ट्रेलियाने मैदानात तग धरत लढा सुरु ठेवला स्टिव्ह स्मिथ आणि लाबुशेन या फलंदाजांनी आपल्या ठेवणीतले फटके खेळत भारतीय गोलंदाजांच्या नाकीनऊ आणण्यास सुरुवात केले. हे दोन फलंदाज भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी ठरणार असं वाटत असतानाच लाबुशेन जाडेजाच्या गोलंदाजीवर बाद झाला.

यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावाला गळती लागली. यष्टीरक्षक कॅरी माघारी परतल्यानंतर खेळपट्टीवर तग धरुन राहिलेला स्मिथही त्रिफळाचीत झाला. केवळ दोन धावांनी स्मिथचं शतक हुकलं. त्याने १०२ चेंडूत ९ चौकार आणि एका षटकाराच्या सहाय्याने ९८ धावा केल्या. यानंतर ऑस्ट्रेलियाचे फलंदाज तग धरु शकले नाही. शमी, सैनी यांनी एकाच षटकात कांगारुंना दणके देत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारताकडून मोहम्मद शमीने ३ बळी घेतले. त्याला नवदीप सैनी, रविंद्र जाडेजा आणि कुलदीप यादवने प्रत्येकी २-२ तर जसप्रीत बुमराहने एक बळी घेत चांगली साथ दिली.

त्याआधी, सलामीवीर रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली आणि मधल्या फळीत लोकेश राहुल यांनी केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर राजकोट वन-डे सामन्यात भारतीय संघाने ३४० धावांचा पल्ला गाठला. पहिल्या सामन्याच्या तुलनेत दुसऱ्या वन-डेत भारतीय फलंदाजांची कामगिरी सुधारलेली पहायला मिळाली. कांगारुंकडून फिरकीपटू झॅम्पा आणि रिचर्डसन या गोलंदाजांना सामन्यात यश मिळालं.

पहिल्या सामन्यात अपयशी ठरलेल्या रोहित शर्मा आणि शिखर धवन जोडीने दुसऱ्या सामन्यात डावाची सुरुवात सावधपणे केली. दोन्ही फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा नेटाने सामना करत पहिल्या विकेटसाठी ८१ धावांची भागीदारी केली. रोहित शर्माला ४२ धावांवर बाद करत झॅम्पाने भारताची जमलेली जोडी फोडली. यानंतर शिखर धवन आणि विराट कोहली यांनी संघाचा डाव सावरत दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.

या दोन्ही फलंदाजांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा समाचार घेत मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. शिखर धवन आपल्या शतकापासून ४ धावा दूर असताना रिचर्डसनच्या गोलंदाजीवर स्टार्कने त्याचा झेल घेतला. यानंतर मैदानावर आलेला श्रेयस अय्यरही फारशी चमक दाखवू शकला नाही. यानंतर विराटने लोकेश राहुलच्या साथीने पुन्हा एकदा महत्वपूर्ण भागीदारी करत संघाला आश्वासक धावसंख्येच्या दिशेने नेलं. यादरम्यान विराट कोहलीने आपलं अर्धशतकही पूर्ण केलं. विराट आपलं शतक झळकावणार असं वाटत असतानाच झॅम्पाने त्याचा अडसर दूर केला. त्याने ७८ धावांची खेळी केली. यानंतर तब्बल वर्षभराच्या कालावधीनंतर सामन्यात संधी मिळालेला मनिष पांडेही झटपट माघारी परतला. दरम्यान लोकेश राहुलने अष्टपैलू रविंद्र जाडेजाला सोबत घेत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आणि संघाला ३४० धावांचा टप्पा गाठून दिला, त्याने ८० धावा केल्या.

Live Blog

Highlights

  • 19:46 (IST)

    स्टिव्ह स्मिथचं संयमी अर्धशतक

    ??????? ???? ?????? ??????????? ????? ??? ??????? ????? ?????? ??????????? ????? ??? ?????? ??? ??????

  • 18:57 (IST)

    रविंद्र जाडेजाने कांगारुंची जमलेली जोडी फोडली, कर्णधार फिंच माघारी

    ??????? ?????????? ?????????? ???? ????, ????? ??????? ???? ????????

    ?????? ?? ??????? ????

  • 18:03 (IST)

    ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, डेव्हिड वॉर्नर माघारी

    ??????? ??????? ?????????? ??????? ?????? ????? ???????? ???

    ?? ???? ???? ?????? ???, ????????????? ????? ?????

  • 16:39 (IST)

    भारताला चौथा धक्का, विराट कोहली माघारी

    ?????????? ?????????? ??? ???? ??????????? ????????? ?????????? ??????????? ?????????????????? ??????????? ????????? ????? ????? ???

    ?? ???? ????? ????? ?????? ?????

  • 15:54 (IST)

    श्रेयस अय्यर त्रिफळाचीत; भारताला तिसरा धक्का

    ??????? ?????????? ?????? ?????? ????? ?????? ?????????? ??????? ??? ??? ???? ? ??????? ?????????? ????.

  • 15:38 (IST)

    'गब्बर'ला शतकाची हुलकावणी; भारताला दुसरा धक्का

    ????? ???? ???????? ???? ????? ?????? ???????? ????. ?? ??????? ???? ???? ??????? ?? ??? ???? ??? ??????? ????? ????? ????.

  • 14:10 (IST)

    भारतीय सलामीवीरांची सावध सुरुवात

    ??????? ????????? ?????-?????? ???????? ????????

    ??????????? ??????????? ?????? ????? ??? ?? ??????????? ????? ???????

  • 13:10 (IST)

    भारतीय संघात दोन बदल...

    ???? ??????? ?????? ????? ?????, ??????? ????????? ???? ????? ?????? ????

  • 13:08 (IST)

    ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

    ??????? ??????? ???????? ??????????????? ????? ??????? ??? ?????

21:37 (IST)17 Jan 2020
ऑस्ट्रेलियाचा अखेरचा फलंदाज माघारी, भारताची सामन्यात बाजी

झॅम्पा बुमराहच्या गोलंदाजीवर माघारी, भारत ३६ धावांनी सामन्यात विजयी

मालिकेतही १-१ ने बरोबरी

21:20 (IST)17 Jan 2020
अखेरच्या षटकांत कांगारुंची दाणादाण, नवदीप सैनीचे एकाच षटकात दोन बळी

टर्नर आणि स्टार्कला धाडलं माघारी, कांगारुंचे ९ गडी बाद

21:05 (IST)17 Jan 2020
मोहम्मद शमीचे एकाच षटकात कांगारुंना दोन दणके

टर्नर आणि पॅट कमिन्सला लागोपाठच्या चेंडूवर धाडलं माघारी

कांगारुंचे सात फलंदाज तंबूत परतले

20:32 (IST)17 Jan 2020
त्याच षटकात स्टिव्ह स्मिथ माघारी, निम्मा संघ तंबूत परतला

कुलदीपच्या गोलंदाजीवर फटका खेळण्याच्या प्रयत्नात बॅटची कड घेऊन चेंडू स्टम्पवर

९८ धावांवर स्मिथ माघारी, कांगारुंना मोठा धक्का

20:29 (IST)17 Jan 2020
कुलदीप यादवचा कांगारुंना दणका, कॅरी माघारी

विराट कोहलीने घेतला कॅरीचा झेल, ऑस्ट्रेलियाचा चौथा गडी बाद

कुलदीपचा वन-डे कारकिर्दीतला शंभरावा बळी

20:11 (IST)17 Jan 2020
ऑस्ट्रेलियाची जमलेली जोडी फुटली, लाबुशेन माघारी

रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर मोहम्मद शमीने घेतला झेल

लाबुशेनची ४६ धावांची खेळी

19:46 (IST)17 Jan 2020
स्टिव्ह स्मिथचं संयमी अर्धशतक

कर्णधार फिंच माघारी परतल्यानंतर स्मिथ आणि लाबुनेश यांनी भारतीय गोलंदाजांचा सामना करत संघाचा डाव सावरला

18:57 (IST)17 Jan 2020
रविंद्र जाडेजाने कांगारुंची जमलेली जोडी फोडली, कर्णधार फिंच माघारी

रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर फिंच फसला, लोकेश राहुलने केलं यष्टीचीत

फिंचची ३३ धावांची खेळी

18:03 (IST)17 Jan 2020
ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, डेव्हिड वॉर्नर माघारी

मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर पांडेने एकहाती घेतला वॉर्नरचा झेल

१५ धावा काढत वॉर्नर बाद, ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का

17:15 (IST)17 Jan 2020
भारतीय संघाची ३४० धावांपर्यंत मजल

ऑस्ट्रेलियाला विजयासाठी ३४१ धावांचं आव्हान

17:14 (IST)17 Jan 2020
अखेरच्या षटकात लोकेश राहुल धावबाद

चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात राहुल माघारी, भारताला सहावा धक्का

५२ चेंडूत राहुलची ८० धावांची खेळी...या खेळीत ६ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश

16:48 (IST)17 Jan 2020
लोकेश राहुलचं धडाकेबाज अर्धशतक

रविंद्र जाडेजाच्या मदतीने कांगारुंचा समाचार घेत राहुलची फटकेबाजी

16:43 (IST)17 Jan 2020
मनिष पांडेही माघारी परतला, भारताचा निम्मा संघ माघारी

केन रिचर्डसनने घेतला बळी, भारताची त्रिशतकी धावसंख्येकडे वाटचाल

16:39 (IST)17 Jan 2020
भारताला चौथा धक्का, विराट कोहली माघारी

झॅम्पाच्या गोलंदाजीवर उंच फटका खेळण्याच्या प्रयत्नात सीमारेषेवर ऑस्ट्रेलियन क्षेत्ररक्षकांच्या समन्वयामुळे स्टार्कने घेतला सुरेख झेल

७८ धावा काढून कोहली माघारी परतला

16:05 (IST)17 Jan 2020
कर्णधार विराट कोहलीचं अर्धशतक

ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा विराटने केला संयमाने सामना, भारताने ओलांडला २०० धावांचा टप्पा

15:54 (IST)17 Jan 2020
श्रेयस अय्यर त्रिफळाचीत; भारताला तिसरा धक्का

भारताचा महत्त्वाचा फलंदाज श्रेयस अय्यर चौथ्या क्रमांकावर खेळायला आला आणि केवळ ७ धावांवर त्रिफळाचीत झाला.

15:38 (IST)17 Jan 2020
'गब्बर'ला शतकाची हुलकावणी; भारताला दुसरा धक्का

दमदार खेळी करणाऱ्या शिखर धवनला शतकाने हुलकावणी दिली. ९६ धावांवर मोठा फटका खेळताना तो बाद झाला आणि भारताला दुसरा धक्का बसला.

15:16 (IST)17 Jan 2020
भारताच्या 'गब्बर'चे दमदार अर्धशतक

सलामीवीर शिखरचे सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक; पहिल्या सामन्यात केल्या होत्या ७४ धावाहे वाचा - देशासाठी कायपण! धवनचं दमदार उत्तर

14:55 (IST)17 Jan 2020
भारताने ओलांडला शतकी धावसंख्येचा टप्पा

शिखर-विराटची संयमी फलंदाजी, भारताने ओलांडला शतकी धावसंख्येचा टप्पा

14:37 (IST)17 Jan 2020
भारताला पहिला धक्का, रोहित शर्मा माघारी

फिरकीपटू झॅम्पाने भारताची जमलेली जोडी फोडली, रोहित शर्मा ४२ धावांवर माघारी

पहिल्या विकेटसाठी रोहित-शिखरमध्ये ८१ धावांची भागीदारी

14:10 (IST)17 Jan 2020
भारतीय सलामीवीरांची सावध सुरुवात

पहिल्या विकेटसाठी रोहित-शिखरची अर्धशतकी भागीदारी

ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा नेटाने सामना करत ५० धावसंख्येचा टप्पा ओलांडला

13:10 (IST)17 Jan 2020
भारतीय संघात दोन बदल...

मनिष पांडेला भारतीय संघात स्थान, शार्दुल ठाकूरच्या जागी नवदीप सैनीला संधी

13:09 (IST)17 Jan 2020
असा असेल ऑस्ट्रेलियाचा अंतिम ११ जणांचा संघ...
13:08 (IST)17 Jan 2020
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय

मालिकेत आघाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघात कोणतेही बदल नाहीत

12:41 (IST)17 Jan 2020
ऋषभ पंतच्या जागी के.एस.भरतला भारतीय संघात पर्यायी यष्टीरक्षक म्हणून स्थान
12:40 (IST)17 Jan 2020
पंतच्या अनुपस्थितीत कोणाला मिळणार भारतीय संघात संधी??
12:39 (IST)17 Jan 2020
पहिल्याच सामन्यात भारतीय संघाला फिंच-वॉर्नर जोडीचा तडाखा

१० गडी राखून ऑस्ट्रेलिया पहिल्या सामन्यात विजयी, मालिकेत १-० ने आघाडी

मालिकेतलं आव्हान कायम राखण्यासाठी भारतीय संघाला आजच्या सामन्यात विजय अनिवार्य

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Australia tour of india 2019 2nd odi rajkot live updates psd
First published on: 17-01-2020 at 12:30 IST