ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या तिसऱया कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर याने दमदार फलंदाजी करत पहिल्याच सत्रात ७८ चेंडूत शतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे. अशी किमया करणारा डेव्हिड वॉर्नर हा जगातील पाचवा तर ऑस्ट्रेलियाचा चौथा फलंदाज ठरला आहे.

VIDEO: विराट कोहलीचा नववर्षाचा संकल्प

डेव्हिड वॉर्नरने ठोकलेले शतक सिडनीच्या मैदानावरील आजवरचे सर्वात वेगवान शतक ठरले आहे. वॉर्नरच्या आधी ऑस्ट्रेलियाकडून डॉन ब्रॅडमन यांनी १९३० साली असा पराक्रम केला होता. तर १९७६ साली पाकिस्तानच्या माजिद खान यानेही शतकी कामगिरी केली होती. वॉर्नरने पाकिस्ताविरुद्ध तिसऱ्या कसोटीत पहिल्या दिवसाच्या उपहारापर्यंत नाबाद १०० धावा केल्या. त्यानंतर तो ११३ धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टर ट्रंपर याने १९०२ साली मॅनचेस्टरमधील सामन्यात उपहारापूर्वी १०३ धावा केल्या होत्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्याच चार्ली मैकार्टनी यांनी १९२६ साली लिड्समध्ये ११२ धावा केल्या होत्या. कसोटी विश्वातील या विक्रमी कामगिरीनंतर वॉर्नर म्हणाला की, विक्रमामुळे मला आनंद तर आहेच पण माझा हा फॉर्म कायम राखण्याचा प्रयत्न असणार आहे.

वाचा: बीसीसीआयमध्ये आता ‘दादागिरी’, सौरव गांगुलीकडे अध्यक्षपद?

 

डॉन ब्रॅडमन यांनी १९३० साली उपहारापूर्वी १०५ धावा करून विक्रम केला होता. त्याचसोबत याच डावात त्यांनी ३३४ धावांच्या विक्रमाची नोंद केली होती.