कोणत्याही क्रिकेट सामन्यामध्ये पंचांची भूमिका ही महत्वाची मानली जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शनिवारी एका ऐतिहासीक कामगिरीची नोंद करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्लेरी पोलोसाक यांनी नामिबिया विरुद्ध ओमान यांच्यातील सामन्यात पंचांची भूमिका पार पडली. आयसीसीने या ऐतिहासीक घटनेचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

क्लेरी या ३१ वर्षांच्या आहेत. आतापर्यंत त्यांनी महिलांच्या १५ एकदिवसीय सामन्यांमध्ये पंचगिरी केली आहे. २०१६ साली झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्या सामन्यापासून क्लेयर यांनी पंचगिरीला सुरुवात केली होती. आयसीसीच्या सामन्यांमध्ये क्लेरी यांच्याकडून आतापर्यंत चांगली कामगिरी पाहायला मिळाली आहे.