28 February 2021

News Flash

Video : सीमारेषेवर मॅक्सवेलने हवेतच पकडला झेल

सामन्यात मॅक्सवेलने केली अष्टपैलू कामगिरी

आॅस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या एकमेव टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करवा लागला. दक्षिण आफ्रिकेने ऑस्ट्रेलियावर २१ धावांनी विजय मिळवला. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना दहा षटकांचा खेळवण्यात आला होता. ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना १० षटकात ६ बाद १०८ धावा केल्या. विजयासाठी १०९ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ १० षटकात ८७ धावापर्यंत मजल करू शकला. त्यामुळे त्यांना २१ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

या सामन्यात सर्वात जास्त चर्चा झाली ती फाफ डुप्लेसीला बाद करताना मॅक्सवेलने घेतलेल्या झेलाची. ग्लेन मॅक्सवेलने सीमारेषेवर फाफचा अफलातून झेल टिपला. या सामन्यात आॅस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने केलेली अष्टपैलू कामगिरी केली. मात्र त्याची कामगिरी ऑस्ट्रेलियायाला सामना जिंकवून देऊ शकली नाही.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेकडून डिकॉकने २२, कर्णधार ड्यु प्लेसीस २७ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून मॅक्सवेलने एक, अँड्रू टाय, नॅथन कूल्टर नाईल यांनी प्रत्येकी दोन-दोन बळी टिपले. ऑस्ट्रेलियाचा संघ ८७ धावांपर्यत मजल मारू शकला. ऑस्ट्रेलियाकडून मॅक्सवेलने ३८ धावांची खेळी केली. मॅक्सवेल वगळता इतर फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2018 5:16 pm

Web Title: australian cricketer glenn maxwell took superb catch on the boundary line
टॅग : Glenn Maxwell
Next Stories
1 IND vs AUS : ऑस्ट्रेलियात विजयाची छाप सोडायची आहे – रोहित शर्मा
2 शाहरुख, ए. आर. रहमान म्हणतायत ‘जय हिंद!’
3 …तेव्हाच सेहवागने केली होती पहिला भारतीय त्रिशतकवीर होण्याची भविष्यवाणी
Just Now!
X