24 September 2020

News Flash

बंगळुरू-जयपूर लढत बरोबरीत

जयपूर पिंक पँथर्सने बुधवारी घरच्या मैदानावर तेलुगू टायटन्सला नमवत दिमाखदार सुरुवात केली होती.

जयपूर पिंक पँथर्सने बुधवारी घरच्या मैदानावर तेलुगू टायटन्सला नमवत दिमाखदार सुरुवात केली होती. मात्र गुरुवारी बंगळुरू बुल्सने त्यांना बरोबरीत रोखले. जयपूरतर्फे जसवीर सिंगने आक्रमक चढायांसह एकाकी झुंज दिली. महिलांच्या प्रायोगिक स्वरुपाच्या लढतीत आइस दिवासने क्वीन्सला पराभवाचा धक्का दिला. बरोबरीनंतर जयपूरचा संघ नऊ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. बंगळुरू बुल्स चौथ्या स्थानी आहे.

जयपूर पिंक पँथर्स आणि बंगळुरू बुल्स यांच्यात सुरुवातीला ४-४ बरोबरी होती. जसवीर सिंगच्या आक्रमणाच्या बळावर जयपूरने ५-४ अशी निसटती आघाडी घेतली. मध्यंतरापर्यंत बंगळुरूने जयपूरची आघाडी कमी केली. बंगळुरुने १०-७ अशी आघाडी मिळवली. जसवीरने यशस्वी चढाया करत ११-१४ पिछाडी भरून काढली. शब्बीर बापूला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. जयपूरने जसवीरच्या बळावर दुसऱ्या सत्रात २३-१६ असे पुनरागमन केले. जयपूरचा संघ सहज जिंकणार असे चित्र असताना बंगळुरूने आक्रमण आणि बचाव दोन्ही आघाडय़ांवर टिच्चून खेळ करत सामना बरोबरीत सोडवला. महिलांमध्ये आइस दिवास संघाने स्टॉर्म क्वीन्स संघावर २८-१५ अशी मात केली. दमदार आक्रमणाच्या बळावर दिवास संघाने बाजी मारली. अभिलाषा म्हात्रेने ९ गुण पटकावत संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.

आजचे सामने

यू मुंबा वि.दबंग दिल्ली

जयपूर पिंक पँथर्स विरुद्ध बंगाल वॉरियर्स

वेळ : रात्री ८ वाजल्यापासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स

 

यू मुंबाची कसोटी

यू मुंबा संघास लागोपाठच्या दोन पराभवानंतर प्रो कबड्डी लीगमध्ये विजयपथावर येण्यासाठी उत्तम संधी आहे. त्याकरिता त्यांना येथे शुक्रवारी दबंग दिल्लीबरोबर दोन हात करावे लागणार आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 12:39 am

Web Title: bangalore vs jaipur in pro kabaddi
Next Stories
1 ‘झिका’च्या प्रादुर्भावापासून खेळाडूंची काळजी घेणार
2 ऑलिम्पिक चाचणीसाठी उसेन बोल्ट सज्ज
3 पोर्तुगालचे पारडे जड
Just Now!
X