News Flash

बायर्न म्युनिकचा रोमा संघावर ७-१ असा दणदणीत विजय

बायर्न म्युनिक संघाने चॅम्पियन्स लीग स्पर्धेत रोमा संघावर ७-१ असा दणदणीत विजय मिळवला. बायर्न म्युनिकने रोमाला भूईसपाट केले असले तरी चॅम्पियन्स लीगमधील हा सर्वोत्तम विजय

| October 23, 2014 01:23 am

बायर्न म्युनिक संघाने चॅम्पियन्स लीग स्पर्धेत रोमा संघावर ७-१ असा दणदणीत विजय मिळवला. बायर्न म्युनिकने रोमाला भूईसपाट केले असले तरी चॅम्पियन्स लीगमधील हा सर्वोत्तम विजय नाही. कारण यापूर्वी आठ सामन्यांमध्ये ४४ गोल करणाऱ्या शखतार डोनेत्सत संघाने बोरिसोव्ह संघावर बेलारूस येथे ७-० असा विजय मिळवला होता. त्याचबरोबर चेल्सी संघाने स्टॅम्फोर्ड ब्रिज येथील सामन्यात मारिबोर संघावर ६-० असा विजय मिळवला होता.
बायर्न म्युनिककडून आर्येन रॉबेनने आठव्या आणि ३०व्या मिनिटाला गोल करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. ब्राझीलमधील विश्वचषक जर्मनीला जिंकवून देणाऱ्या मारिओ गोएट्झने २३व्या मिनिटाला, तर रॉर्बेट लेवान्डोव्सकीने २५व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर थॉमस म्युलरने ३६व्या मिनिटाला गोल करत संघाला मध्यंतरापूर्वी ५-० अशी दमदार आघाडी मिळवून दिली.
दुसऱ्या सत्रात फँ्रक रीबरीने ७८व्या आणि त्यानंतर दोन मिनिटांनी झेरदान शकिरीने गोल करत संघाची आघाडी ७-० अशी वाढवली. रोमा संघाकडून एकमेव गोल गेर्विन्होने ६६व्या मिनिटाला केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 23, 2014 1:23 am

Web Title: bayern munich beat roma by 1 7 in champions league football tournament
Next Stories
1 राजस्थानच्या आदित्य गरवालचा १८ षटकारांचा विक्रम
2 संक्षिप्त :डी’व्हिलियर्सचे शतक; दक्षिण आफ्रिकेचा विजय
3 सरिता देवीवर निलंबनाचा बडगा
Just Now!
X