पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांना शुक्रवारी पाकिस्तानी सैन्याने भारताकडे सोपवलं. वाघा बॉर्डरच्या मार्गाने अभिनंदन वर्थमान सर्व सोपस्कार पार पाडून भारतात दाखल झाले, आणि त्यांच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेल्या प्रत्येक भारतीयांनी एकच जल्लोष केला. भारतात दाखल झाल्यानंतर त्यांना विशेष विमानाने दिल्लीला नेण्यात आलं. अभिनंदन यांच्या घरवापसीनंतर सोशल मीडियावर त्यांच्या स्वागताचे अनेक मेसेज पडत आहेत. बीसीसीआयने अभिनंदन यांचं अनोख्या पद्धतीने स्वागत करत सर्वांचं मन जिंकलं आहे.

आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने आज नवीन जर्सीचं अनावरण केलं. या जर्सीचा पहिला क्रमांक अभिनंदन यांना देत बीसीसीआयने त्यांचं स्वागत केलं आहे. तुम्ही आमच्या हृदयात आहात, आणि तुम्ही दाखवलेल्या धैर्यामुळे भविष्यकाळातील पिढीला प्रेरणा मिळो अशा आशयाचा संदेश बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकला आहे.

अभिनंदन यांच्या घरवापसीनंतर संपूर्ण देशभरात जल्लोषाचं वातावरण आहे.