भारतात करोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर केंद्र सरकार उपाययोजना आखत आहे. या विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयातर्फे नियमावली जाहीर करण्यात आलेली आहे. दरम्यान बीसीसीआयनेही आपल्या खेळाडूंसाठी नियमावली जाहीर केली आहे. बीसीसीआयचं वैद्यकीय पथक सर्व खेळाडूंच्या आरोग्यावर लक्ष ठेवून आहे, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ३ वन-डे सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार असून…करोनापासून वाचण्यासाठी बीसीसीआयने खेळाडूंना नियम आखून दिले आहेत.

जाणून घेऊयात काय आहेत हे नियम??

१) साबणाने किमान २० सेकंद हात धुवा

२) शक्य त्या ठिकाणी सॅनिटाईजरचा वापर करा

३) शिंक किंवा खोकला येत असेल तर तोंडावर हात ठेवा

४) कोणत्याही प्रकारे बरं वाटत नसेल तर त्वरित वैद्यकीय समुहाला कळवा

५) हात धुतल्याशिवाय, चेहरा-नाक-डोळ्यांना स्पर्श करणं टाळा

६) स्वच्छता नसलेल्या हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये खाणं टाळा

७) तुमच्या संघाबाहेरील व्यक्तीशी संपर्क टाळा, हस्तांदोलन करु नका. चाहत्यांसोबत सेल्फी घेणं टाळा

दरम्यान बीसीसीआयशी संलग्न असणाऱ्या सर्व राज्य क्रीडा संघटनांनाही ही नियमावली पाठवण्यात आलेली आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्याकरता हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनने मैदानावर खास रुग्णवाहिका आणि डॉक्टरांचं पथक नेमलं आहे.

अवश्य वाचा –  यंदाचं आयपीएल परदेशी खेळाडूंविना?? IPL गव्हर्निंग काऊन्सिल परिस्थितीचा आढावा घेणार