25 November 2020

News Flash

BCCI निवड समितीसाठी चार नावं निश्चीत; माजी मराठमोळा खेळाडूही शर्यतीत

महिन्याअखेरीस नवीन सदस्यांची निवड

बीसीसीआयच्या निवड समितीचे माजी प्रमुख एम.एस.के. प्रसाद यांचा कार्यकाळ संपल्यानंतर, नवीन अर्ज मागवण्यात आले होते. अनेक माजी खेळाडूंनी या पदासाठी अर्ज केले, मात्र या सर्वांमधून ४ नावं अंतिम करण्यात आलेली असून, क्रिकेट सल्लागार समिती या चारही उमेदवारांची मुलाखत घेणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस निवड समितीच्या नवीन प्रमुखांची निवड होणार असून, आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेसाठी संघ निवडण्याची मोठी जबाबदारी नवीन उमेदवाराच्या खांद्यावर असणार आहे.

बीसीसीआयच्या निवड समितीमधील प्रसाद आणि गगन खोडा यांचा कार्यकाळ आता संपलेला आहे. त्यामुळे मुलाखतीसाठी अंतिम करण्यात आलेल्या ४ जणांच्या यादीतून दोघांची निवड समितीवर निवड होणार आहे. माजी फिरकीपटू, लक्ष्मण शिवरामकृष्णन, वेंकटेश प्रसाद, अजित आगरकर आणि राजेश चौहान या खेळाडूंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलेलं आहे. मदन लाल, रुद्रप्रताप सिंह आणि सुलक्षणा नाईक यांची क्रिकेट सल्लागार समिती नवीन सदस्यांची निवड करणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2020 4:00 pm

Web Title: bcci shortlist 4 candidates for selection panel cac to interview them psd 91
टॅग Bcci
Next Stories
1 दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधारपदावरुन डु-प्लेसिस पायउतार
2 जगातल्या सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानावर टीम इंडिया दिवस-रात्र कसोटी सामना खेळणार?
3 बुमराहच्या क्षमतेवर शंका घेणं चुकीचं – मोहम्मद शमी
Just Now!
X