इंग्लंडमध्ये विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झालेली असताना बीसीसीआयने भारतामध्ये प्रथमश्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या एका खेळाडूवर बंदीची कारवाई केली आहे. रिंकू सिंह असं या खेळाडूचं नाव असून तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळतो.

बीसीसीआयच्या परवानगीशिवाय रिंकूने अबुधाबी येथील मान्यता नसलेल्या टी-२० लीगमध्ये सहभाग घेतला. बीसीसीआयच्या नियमांनुसार आंतरराष्ट्रीय आणि प्रथमश्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूला बाहेरील देशांमधील टी-२० लीग खेळण्यासाठी बोर्डाची परवानगी घ्यावी लागते. रिंकूने ही परवानगी घेतली नसल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापर्यंत रिंकून भारतात कोणत्याही प्रकारचे क्रिकेट सामने खेळू शकणार नाहीये.

अवश्य वाचा – Video : रवी शास्त्री म्हणतात, अभी तो मै जवान हूं !