News Flash

IPL 2021 : मायदेशी परतलेल्या बेन स्टोक्सने गावसकरांना केले ट्रोल!

समालोचन करताना गावसकरांनी केली मोठी चूक

बेन स्टोक्स आणि सुनील गावसकर

राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स बोटाच्या दुखापतीनंतर इंग्लंडला परतला आहे. मात्र, त्याचे आयपीएल प्रेम कमी झालेले नाही. प्रत्येक मॅचवर त्याची नजर असते. रविवारी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यादरम्यान बेन स्टोक्सने ट्विट करत समालोचक सुनील गावसकर यांना ट्रोल केले. ट्विटमध्ये स्टोक्सने गावसकरांचे नाव घेतले नाही.

पंजाब किंग्जचा संघ फलंदाजी करीत असताना सुनील गावसकर समालोचन करत होते. 11व्या षटकात पंजाबच्या मयंक अग्रवालने दिल्लीचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाला दोन षटकार लगावले. त्यानंतर रबाडाने पंजाबचा कर्णधार केएल राहुलला बाउन्सर टाकला. राहुलने हा चेंडू हुक केला. त्यावेळी गावसकर म्हणाले, ”काय खराब बाउन्सर आहे! जर आपल्याला बाउन्सर टाकायचा असेल, तर तो ऑफ स्टंपच्या वर असावा.”

गावसकरांच्या या वाक्यानंतर रीप्ले दाखवण्यात आला. यात हा बाउन्सर ऑफ-स्टंपच्या अगदी वर होता. या घटनेवर स्टोक्सने ट्विट केले. त्याने आपल्या ट्विटमध्ये गावसकरांचे नाव न घेता एक इमोजी पोस्ट केला.

 

स्टोक्सच्या या ट्विटवर अनेक भारतीयांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. आमच्या वेदना समजून घेतल्याबद्दल धन्यवाद, आम्ही आयपीएलच्या पहिल्या दिवसापासू हे सहन करत आहोत, अशा प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या आहेत.

दिल्लीचा पंजाबवर विजय

काल रविवारी (18 एप्रिल) केएल राहुलचा वाढदिवस होता, पण त्याचा संघ हा सामना गमावून बसला. प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने 4 गडी राखून 195 धावा केल्या. दिल्लीने 10 चेंडू ठेऊन आणि 6 गडी राखून हा सामना जिंकला. दिल्ली कॅपिटल्सचा हा तीन सामन्यांमधील दुसरा विजय आहे. ते आता गुणतालिकात दुसर्‍या क्रमांकावर पोहोचले आहेत. पंजाब किंग्जला तीन सामन्यात दुसरा पराभव पत्करावा लागला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 19, 2021 3:19 pm

Web Title: ben stokes trolls sunil gavaskar for committing a blunder in ipl 2021 match adn 96
Next Stories
1 IPL 2021: बेन स्टोक्सला राजस्थान संघाकडून भावनिक निरोप
2 IPL 2021 : कशी नशिबानं थट्टा आज मांडली…
3 DC vs PBKS : ‘गब्बर’च्या गर्जनेमुळे पंजाब किंग्ज गारद!
Just Now!
X