‘नवोदित मुंबई-श्री’ विजेतेपदानंतर अनिल बिलावाची दमदार कामगिरी

मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धा

Top 5 Oldest Player To Score A Century In IPL
IPL 2024 : रोहित शर्मासह ‘या’ पाच सर्वात वयस्कर खेळाडूंनी आयपीएलमध्ये झळकावलयं शतक, जाणून घ्या कोण आहेत?
Rohit Sharma Ishan Kishan Romario Shepherd Gerald Coetzee Tim David contributed to MI win
IPL 2024 : मुंबई इंडियन्सच्या पहिल्यावहिल्या विजयात ‘या’ पाच खेळाडूंनी बजावली महत्त्वाची भूमिका
Kwena Maphaka has recorded embarrassing record in IPL 2024
IPL 2024 : हैदराबादविरुद्धच्या सामन्यात वर्ल्डकप गाजवणाऱ्या मुंबईच्या गोलंदाजाची धुलाई; नावावर नोंदला गेला नकोसा विक्रम
Sunrisers Hyderabad vs Mumbai Indians IPL 2024 Live Score in Marathi
IPL 2024 : ‘रन’ धुमाळीत हैदराबादची सरशी, मुंबई इंडियन्सवर ३१ धावांनी विजय

तुषार वैती, मुंबई</strong>

आठ तास नोकरी आणि त्यानंतर मुला-बाळांचा सांभाळ करून घराकडे लक्ष देताना सर्वाचीच दमछाक होते. अनेकांना तर आपल्या स्वप्नांनाही मुरड घालावी लागते. पण वर्षभरापूर्वी स्पर्धामध्ये उतरण्याचे गांभीर्याने घेतल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर अनिल बिलावा याने ‘नवोदित मुंबई-श्री’नंतर आता मुंबई-श्री किताबावर नाव कोरण्याची किमया साधली. लागोपाठ या दोन्ही स्पर्धाची जेतेपदे पटकावणारा हक्र्युलस जिमचा अनिल बिलावा हा पहिला शरीरसौष्ठवपटू ठरला आहे.

सांताक्रूझ येथील वाकोला येथे वास्तव्यास असलेला तसेच आई-वडील, पत्नी आणि दोन मुली आणि खासगी नोकरी अशी तारेवरची कसरत करत गेल्या १८ ते २० वर्षांपासून व्यायाम करणाऱ्या अनिलला त्याच्या मित्राने शरीरसौष्ठवाकडे वळण्याचा सल्ला दिला. अनिलनेही मित्राचे म्हणणे गांभीर्याने घेत ऑगस्ट २०१८ मध्ये गेल्या वर्षी अतुल आंब्रेला ‘मुंबई-श्री’ घडविणारे प्रशिक्षक संजय चव्हाण यांची भेट घेतली. संजय चव्हाण यांनीही एखादे शिल्प कोरावे तसा अनिलच्या ओबडधोबड शरीराला आकार दिला. अवघ्या सहा महिन्यांच्या मेहनतीनंतर ८० किलो वजनी गटात विजेतेपदाचा मान संपादन केल्यानंतर जेव्हा किताबासाठी व्यासपीठावर उतरला, त्यावेळी अन्य प्रतिस्पध्र्यापेक्षा कित्येक पटीने सरस असलेल्या अनिल बिलावा याला किताब विजेता घोषित करताना परीक्षकांमध्येही दुमत नव्हते.

आता महाराष्ट्र-श्री स्पर्धेत विजेतेपद पटकावण्याचे आपले ध्येय असल्याचे अनिल बिलावाने मुंबई-श्री किताब पटकावल्यानंतर सांगितले. तो म्हणाला, ‘‘महाराष्ट्रातील तगडय़ा प्रतिस्पध्र्यासमोर खेळताना मला स्वत:ला सिद्ध करावयाचे आहे. यापुढे आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये खेळण्याचे माझे स्वप्न आहे.’’ ‘‘आतापर्यंत कोणत्याही शरीरसौष्ठवपटूला एकाच वर्षी नवोदित मुंबई-श्री आणि मुंबई-श्री हे किताब पटकावता आले नाहीत. अनेक जण या दोन स्पर्धा जिंकण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घालतात. पण अनिल बिलावाने पहिल्याच प्रयत्नात हे शिखर सर केले आहे. सहा महिन्यांपूर्वी मी अनिलचे नावही ऐकले नव्हते, त्यामुळे माझ्यासाठी हा स्वप्नवत प्रवास आहे,’’ असे लागोपाठ दोन वेळा मुंबई-श्री घडविणारे प्रशिक्षक अतुल चव्हाण यांनी सांगितले.

‘मुंबई श्री’चा निकाल

’ ५५ किलो – १) नितीन शिगवण, २) जितेंद्र पाटील, ३) राजेश तारवे

’  ६० किलो – १) अविनाश वने, २) देवचंद गावडे, ३) आकाश घोरपडे

’  ६५ किलो – १) उमेश गुप्ता, २) संदेश सकपाळ, ३) जगदीश कदम

’  ७० किलो – १) रोहन गुरव, २) संदीप कवडे, ३) महेश पवार

’  ७५ किलो – १) भास्कर कांबळी, २) मोहम्मद हुसेन, ३) अमोल गायकवाड

’  ८० किलो – १) अनिल बिलावा, २) सुशील मुरकर, ३) सुशांत रांजणकर

’  ८५ किलो – १) सकिंदर सिंग, २) दीपक तांबीटकर, ३) उबेद पटेल

’  ९० किलो – १) महेश राणे, २) प्रसाद वाळंज, ३) विजय यादव

’  ९० किलोवरील – १) निलेश दगडे, २) रविकांत पाष्टे.

’  किताब विजेता – अनिल बिलावा (हक्र्युलस जिम)

’  सर्वोत्तम प्रगतीकारक खेळाडू – सकिंदर सिंग (फॉच्र्युन फिटनेस)

’  मिस मुंबई – मंजिरी भावसार (एफएसटी जिम)

मंजिरी भावसारला ‘मिस मुंबई’चे जेतेपद

पीळदार सौंदर्यवतींसाठीच्या ‘मिस मुंबई’ शरीरसौष्ठव स्पर्धेत एफएसटी जिमची डॉ. मंजिरी भावसार विजेती ठरली. १० वर्षांच्या मुलाची आई असलेल्या मंजिरीने नवऱ्याच्या पाठिंब्यामुळे ही किमया केली आहे. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मला देशाचे नाव उंचवायचे आहे. त्यासाठी मी अथक मेहनत घेण्यासाठी सज्ज आहे, असे मंजिरी यांनी सांगितले. तळवलकर्स जिमची हीरा सोलंकी हिने उपविजेतेपद पटकावले.