बर्लिन : रॉबर्ट लेव्हानडोव्हस्कीने झळकावलेल्या हॅट्ट्रिकमुळे बायर्न म्युनिकने आयनट्राच फ्रँकफर्टचा ५-० असा धुव्वा उडवला.

पोलंडच्या लेव्हानडोव्हस्कीला बुधवारी झालेल्या चॅम्पियन्स लीगमधील अ‍ॅटलेटिको माद्रिदविरुद्धच्या ४-० अशा विजयात एकही गोल झळकावता आला नव्हता. पण लेव्हानडोव्हस्कीने १०व्या, २६व्या आणि ६०व्या मिनिटाला गोल करत हॅट्ट्रिक साजरी के ली. त्याचा हा बुंडेसलीगामधील पाचव्या सामन्यातील १०वा गोल ठरला. अन्य सामन्यांत, आरबी लेपझिगने हेर्था संघाचा २-१ असा पाडाव करत १३ गुणांसह अग्रस्थान पटकावले आहे. बायर्न म्युनिक १२ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे.

लिव्हरपूलचा विजय; मँचेस्टर सिटी, युनायटेडची बरोबरी

इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये लिव्हरपूलने गेल्या दोन सामन्यांतील खराब कामगिरीनंतर शेफिल्ड युनायटेडचा २-१ असा पराभव करत आपली विजयाची गाडी रुळावर आणली. त्यामुळे लिव्हरपूलने १३ गुणांसह दुसऱ्या स्थानी झेप घेतली. सँडेर बेर्गेने १३व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करत शेफिल्ड युनायटेडला आघाडी मिळवून दिली होती. त्यानंतर रॉबेटरे फिरमिनो आणि दिओगो जोटा यांनी गोल करत लिव्हरपूलला विजय मिळवून दिला. मँचेस्टर युनायटेड आणि मँचेस्टर सिटीला २०१४नंतर प्रथमच इतकी खराब सुरुवात करता आली.

सिटीला वेस्टहॅम युनायटेडविरुद्ध १-१ अशी बरोबरी पत्करावी लागल्याने त्यांची १२व्या स्थानी घसरण झाली आहे. चेल्सीविरुद्धची लढत गोलशून्य बरोबरीत सोडवत युनायटेड १५व्या क्रमांकावर पोहोचला आहे.

आयॅक्सचा विक्रमी विजय

* आयॅक्स संघाने व्हीव्हीव्ही वेनलोचा १३-० असा धुव्वा उडवत डच लीगच्या इतिहासातील विक्रमी विजयाची नोंद के ली. लॅसिना ट्राओरे याने पाच गोल झळकावत तीन गोलमध्ये साहाय्यकाची भूमिका निभावली. मार्को व्हॅन बास्टेन यांच्या १९८५नंतरच्या कामगिरीनंतर एका सामन्यात पाच गोल करणारा ट्राओरे हा आयॅक्सचा पहिला खेळाडू ठरला आहे. जर्गेन एक्केलेनकॅ म्प आणि क्लास-यान हन्टेलार यांनी प्रत्येकी दोन गोल केले.

‘एल क्लासिको’ लढतीत रेयाल माद्रिदची सरशी

*  फे डेरिको वाल्वेर्डे, सर्जियो रामोस तसेच लुका मॉड्रिच यांनी के लेल्या गोलमुळे रेयाल माद्रिदने ला-लीगामधील अव्वल दोन संघांमध्ये रंगलेल्या ‘एल क्लासिको’ लढतीत ३-१ अशी सरशी साधली. पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत रंगलेल्या या क्लासिको लढतीत वाल्वेर्डेने पाचव्या मिनिटाला रेयाल माद्रिदचे खाते खोलले होते. त्यानंतर अन्सू फाटीने आठव्या मिनिटाला बार्सिलोनाला बरोबरी साधून दिली. रामोसने ६०व्या मिनिटाला पेनल्टीवर तर मॉड्रिचने ९०व्या मिनिटाला गोल करत रेयाल माद्रिदला विजय मिळवून दिला. या विजयासह रेयाल माद्रिद अग्रस्थानीअसून बार्सिलोनाची १२व्या स्थानी घसरण झाली आहे.