24 November 2020

News Flash

वाढदिवशी वॉर्नरचे खणखणीत शतक

वॉर्नरच्या नाबाद १०० धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने निर्धारित २० षटकांत २ बाद २३३ धावांचा डोंगर उभा केला.

(संग्रहित छायाचित्र)

ऑस्ट्रेलिया-श्रीलंका ट्वेन्टी-२० मालिका

सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने वाढदिवशी झळकावलेल्या ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील पहिल्यावहिल्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा १३४ धावांनी धुव्वा उडवला. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

वॉर्नरच्या नाबाद १०० धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने निर्धारित २० षटकांत २ बाद २३३ धावांचा डोंगर उभा केला. या खेळीदरम्यान त्याने कर्णधार आरोन फिंच आणि ग्लेन मॅक्सवेल यांच्यासह शतकी भागीदाऱ्या रचल्या. लेगस्पिनर अ‍ॅडम झाम्पाच्या प्रभावी फिरकीमुळे ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला ९ बाद ९९ धावांवर रोखत दणदणीत विजयाची नोंद केली.

अ‍ॅशेस मालिकेतील सुमार कामगिरीनंतर अवघ्या ५६ चेंडूंत १० चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद शतक झळकावत वॉर्नरने आपणही बहरात आल्याचे दाखवून दिले. वॉर्नरने रविवारी अखेरच्या चेंडूवर आपले शतक साजरे केले. श्रीलंकेचा कसुन रंजिता हा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने चार षटकांत एकही बळी न मिळवता ७५ धावा बहाल केल्या.

मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स यांनी श्रीलंकेची आघाडीची फळी नेस्तनाबूत करत पाहुण्यांना ५ बाद ५० अशा अडचणीत आणले होते. त्यानंतर झाम्पाने अखरेचे तीन बळी मिळवत ऑस्ट्रेलियाला मोठा विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया २० षटकांत २ बाद २३३ (डेव्हिड वॉर्नर नाबाद १००, आरोन फिंच ६४, ग्लेन मॅक्सवेल ६२) विजयी वि. श्रीलंका : २० षटकांत ९ बाद ९९ (दासून शनाका १७; अ‍ॅडम झाम्पा ३/१४).

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 28, 2019 1:25 am

Web Title: century to warners birthday australia sri lanka twenty 20 series abn 97
Next Stories
1 यशाचे नवे सूत्र!
2 धोनीच्या निवृत्तीची घाई का?
3 तमिम इक्बालची भारत दौऱ्यातून माघार
Just Now!
X