News Flash

सौरव गांगुली उद्या स्वीकारणार बीसीसीआय अध्यक्षपदाची सूत्रं

सर्वोच्च न्यायालयाने नियुक्ती केलेल्या प्रशासकीय समितीचा कार्यकाळ उद्या संपणार आहे

क्रिकेट विश्वातील ‘दादा’ अशी ओळख असलेला सौरव गांगुली उद्या बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून सूत्रं स्वीकारणार आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल आणि सौरव गांगुली या दोघांच्या नावांची चर्चा होती. मात्र १४ ऑक्टोबर रोजी सौरव गांगुलीनेच अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज दाखल केला. त्यामुळे गांगुली BCCI च्या अध्यक्षपदी विराजमान होणार हे निश्चित झालं होतं. त्यानुसार उद्या सौरव गांगुली बीसीसीआयच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्ती केलेल्या प्रशासकीय समितीचा कार्यकाळ उद्या संपणार आहे. त्यामुळे उद्याच सौरव गांगुलीच्या नावाची घोषणा करण्यात येईल. त्याच्या अध्यक्षतेखाली बीसीसीआयची पहिली वार्षिक सर्वसाधारण सभाही पार पडणार आहे.

सौरव गांगुलीची निवड बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध झाली आहे. तर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह बीसीसीआयच्या सचिवपदी विराजमान होणार आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष अनुराग ठाकूर यांचा भाऊ अरुण धुमाळ हे बीसीसीआयचे कोषाध्यक्ष असणार आहेत.

अध्यक्षपदासाठी भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली आणि माजी क्रिकेटपटू ब्रिजेश पटेल यांच्या नावाची चर्चा होती. BCCI च्या निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर होती. या मुदतीत केवळ सौरव गांगुली यानेच अध्यक्षपदाचा अर्ज दाखल केला. त्यामुळे त्यांना कोणीही प्रतिस्पर्धी नसल्याने त्याचा अध्यक्षपदाचा मार्ग मोकळा झाला. सौरव गांगुली सध्या पश्चिम बंगाल क्रिकेट संघटनेचे अध्यक्षपद भूषवत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुलगा जय शाह हे गुजरात क्रिकेट संघटनेचे तर अरुण सिंग धुमाळ हे हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेचे पदाधिकारी आहेत.  सौरव गांगुलीला १० महिन्यांचा कार्यकाळ मिळणार आहे. गांगुलीला प्रशासकीय कामाचा उत्तम अनुभव आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनची धुराही त्याने यशस्वीरित्या सांभाळली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 9:02 pm

Web Title: coa reign ends as sourav ganguly set to take over as 39th bcci president scj 81
Next Stories
1 IND vs SA : सामन्यादरम्यान रवी शास्त्रींना लागली डुलकी; मीम्स व्हायरल
2 IND vs SA : टीम इंडियाचा भीमपराक्रम; ८४ वर्षानंतर आफ्रिकेला ‘दे धक्का’
3 Video : “घरचं मैदान, पण धोनी कुठाय?” पत्रकाराच्या प्रश्नावर विराटचं उत्तर ऐकाच…
Just Now!
X