News Flash

IPLमध्ये भाग घेतलेले विंडीजचे खेळाडू सुखरूप घरी पोहोचले

वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने मानले BCCI आणि IPL फ्रेंचायझींचे आभार

सुनील नरिन आणि आंद्रे रसेल

आयपीएल २०२१मध्ये भाग घेतलेले खेळाडू आणि टीव्ही प्रॉडक्शनचे सदस्य सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचल्याची माहिती क्रिकेट वेस्ट इंडिजने दिली आहे. आयपीएलचा हा हंगाम करोना विषाणूमुळे पुढे ढकलण्यात आला. लीगचे २९ सामने खेळवल्यानंतर अनेक खेळाडू आणि सहाय्यक कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळले. त्यामुळे आयपीएलला तहकूब करावे लागले.

आयपीएल पुढे ढकलल्यानंतर बीसीसीआय आणि फ्रेंचायझी यांच्यासमोर सर्व खेळाडूंना सुखरूप घरी परत पाठविण्याचे मोठे आव्हान होते. परदेशी खेळाडूंना घरी परत पाठविणे इतके सोपे काम नव्हते. हळूहळू सर्व खेळाडू आपापल्या देशात पोहोचत आहेत. वेस्ट इंडिजचे खेळाडूही त्यांच्या भूमीवर पोहोचले आहेत. वेस्ट इंडिजचे अनेक खेळाडू आयपीएलमध्ये भाग घेतात आणि त्यांचे खूप योगदान असते.

“आमचे आयपीएलमधील खेळाडू आणि जे टीव्ही प्रॉडक्शनचे सदस्य सर्वजण सुरक्षितपणे पोहोचले आहेत. सर्वोत्तम आणि सुरक्षित प्रवासाची व्यवस्था करणाऱ्या बीसीसीआय आणि आयपीएल फ्रेंचायझीचे आम्ही आभार मानतो”, असे वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने ट्वीटमध्ये म्हटले.

 

ड्वेन ब्राव्हो, सुनील नरिन, आंद्रे रसेल, कायरन पोलार्ड, शिमरॉन हेटमायर, निकोलस पूरन असे विंडीजचे स्टार खेळाडू आयपीएलमध्ये भाग घेतात. वेस्ट इंडीज व्यतिरिक्त इतर देशांचे खेळाडूदेखील त्यांच्या घरी पोहोचत आहेत. अलीकडेच पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्सने ट्विट केले होते, की त्यांचे सर्व खेळाडू सुरक्षितपणे त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2021 12:43 pm

Web Title: cricket west indies confirms west indies players in ipl 2021 are back home adn 96
Next Stories
1 “माझ्याशी लग्न करशील?”, राजस्थान रॉयल्सच्या राहुल तेवतियाने सर्वांसमोर केले प्रपोज!
2 “भारत ही एक अशी जागा आहे, जिथे…”, मुंबई इंडियन्सच्या ट्रेंट बोल्टची पोस्ट व्हायरल
3 राजस्थानचा वेगवान गोलंदाज चेतन साकारियाच्या वडिलांचे करोनामुळे निधन
Just Now!
X