30 March 2020

News Flash

World Cup 2019 : कर्णधार विल्यमसनची एकाकी झुंज, पाँटींगसह दिग्गज कर्णधारांना टाकलं मागे

भारताविरुद्ध विल्यमसनच्या ६७ धावा

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत आपल्या संयमी फलंदाजीने पुन्हा एकदा आपलं महत्व सिद्ध केलं आहे. उपांत्य फेरीत भारताविरुद्धच्या सामन्यात आपल्या संघाची पडझड होत असताना, विल्यमसनने एक बाजू लावून धरत अर्धशतक झळकावलं. कर्णधार केन विल्यमसनने ९५ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत ६ चौकारांचा समावेश होता.

या खेळीसह केन विल्यमसनने एका विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणाऱ्या कर्णधारांच्या यादीत महेला जयवर्धनेशी बरोबरी केली आहे. २००७ साली श्रीलंकेचा कर्णधार जयवर्धनेने ५४८ धावा केल्या होत्या. याचसोबत विल्यमसनने रिकी पाँटींगचा २००३ विश्वचषक स्पर्धेतला ५३९ धावांचा विक्रमही मोडीत काढला.

अवश्य वाचा – World Cup 2019 : नकोशा विक्रमात न्यूझीलंडने भारताला टाकलं मागे

न्यूझीलंडचे अन्य फलंदाज झटपट माघारी परतत असताना विल्यमसनने अनुभवी रॉस टेलरसोबत ६५ धावांची भागीदारी करत संघाच्या डावाला आकार दिला.

अवश्य वाचा – World Cup 2019 : दोन विश्वचषक स्पर्धा आणि मार्टीन गप्टीलची अधोगती

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 9, 2019 6:31 pm

Web Title: cricket world cup 2019 nz captain kane williamson slams half century creates unique record against india psd 91
Next Stories
1 World Cup 2019 : मैदानावर पाऊल ठेवताच धोनीचा विक्रम, सचिनच्या पंगतीत मिळवलं स्थान
2 World Cup 2019 – मँचेस्टरमध्ये संध्याकाळी पाऊस पडण्याची शक्यता ९० टक्के
3 ‘कोहिनूर घ्या, बुमराह द्या!’; भारताच्या भन्नाट गोलंदाजीला नेटकऱ्यांचा मिम्सच्या माध्यमातून सलाम
Just Now!
X