दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या सामन्यान चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने चाहत्यांची घोर निराशा केली. यंदाच्या आयपीएल पर्वात चाहत्यांना धोनीकडून खूप अपेक्षा आहेत. मात्र पहिल्याच सामन्यात शून्यावर बाद झाल्याने चाहते त्याच्या फॉर्मबाबत चिंता व्यक्त करत आहेत.

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात सुरैश रैनाने दमदार खेळी करत ३६ चेंडुत ५४ धावा केल्या. मात्र सर्वांच्या नजरा कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर टीकून होत्या. गेल्या काही दिवसात मैदानापासून लांब असलेल्या महेंद्रसिंह धोनीकडून चाहत्यांना मोठ्या फटकेबाजीची अपेक्षा होती. धोनी फलंदाजीसाठी आला खरा मात्र २ चेंडू खेळुन तंबूत परतला. अवेश खानच्या चेंडुवर त्रिफळाचीत झाला. त्याला आपलं खातंही खोलता आलं नाही.

महेंद्रसिंह धोनी आयपीएलच्या इतिहासात चार वेळा शून्यावर बाद झाला आहे. २०१० साली राजस्थान रॉयल्सविरुद्ध, २०१० साली दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध, २०१५ साली मुंबई इंडियन्सविरुद्ध आणि आता दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध शून्यावर बाद झाला आहे. २०१५ नंतर आता धोनी शून्यावर बाद झाला. धोनीने आतापर्यंत १८३ सामन्यात फलंदाजी केली आहे. त्यात त्याने एकूण ४६३२ धावा केल्या आहेत. यात २३ अर्धशतकांचा समावेश आहे.

आयपीएलमध्ये ‘या’ चार भारतीय गोलंदाजांच्या नावावर नकोसा विक्रम

आयपीएल २०२० मध्ये धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाची कामगिरी निराशाजनक राहिली. आयपीएल २०२० पर्वात एकूण १४ पैकी ६ सामने जिंकता आले. तर ८ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. या सुमार कामगिरीमुळे चेन्नईचा संघ मागच्या पर्वात सातव्या स्थानावर होता. संघाकडून यंदा चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. मात्र असं असलं तरी धोनीची जादू चालत नसल्याने चिंता वाढली आहे.