News Flash

शिमला फिरणाऱ्या महेंद्रसिंह धोनीचा ‘दमदार’ लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल!

महेंद्रसिंह धोनी सहकुटुंब शिमल्यात सुट्टीचा आनंद घेत आहे

महेंद्रसिंह धोनीचा 'दमदार' लूक

चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी विविध कारणांमुळे चर्चेत असतो. सध्या तो आपली पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा यांच्यासह सुट्टीवर आहे. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर त्याने हिमाचल प्रदेश गाठले. धोनी शिमल्यात सुट्टीचा आनंद घेत आहे. धोनी चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्याचा नवीन लूक. शिमल्यात असलेल्या धोनीचे फोटो सर्वत्र व्हायरल झाले, यात तो नवीन लूकमध्ये दमदार दिसत आहे. धोनीने आपली मिशी चांगलीच वाढवली आहे.

शिमल्यात पोहोचल्यानंतर धोनी त्याच्या चाहत्यांना भेटला. अनेकांनी त्याच्यासोबत फोटो काढले. शिमल्याला जाण्यापूर्वी धोनीने रांची येथील आपल्या फार्म हाऊसमध्ये आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालवला. तो सोशल मीडियावर कमी अ‍ॅक्टिव्ह असतो, परंतु त्याची पत्नी साक्षी बर्‍याचदा फोटो-व्हिडिओ शेअर करते. या व्हिडिओमध्ये धोनी असतो. साक्षीने शेअर केलेल्या व्हिडिओत ३९ वर्षीय धोनी आपल्या नवीन घोड्यासह धावताना दिसला होता. अलीकडेच धोनीने स्कॉटलंडमधून शेटलंड पोनी जातीचा हा घोडा विकत घेतला. २ वर्षांचा हा घोडा जगातील सर्वात लहान जातींपैकी एक आहे. त्याची उंची फक्त ३ फूट आहे. धोनीकडे आधीपासूनच चेतक नावाचा घोडा आहे, जो ११ महिन्यांचा आहे.

हेही वाचा – कडकच..! एक विकेट घेत दोन विक्रम नावावर करणारा गोलंदाज म्हणजे इशांत शर्मा

 

 

कर्णधार म्हणून धोनी..

धोनी हा भारताकडून सर्वाधिक सामने जिंकणारा कर्णधार आहे. त्याने ३३२ सामन्यांचे नेतृत्व केले. यापैकी त्याने १७८ सामन्यात विजय मिळवला आहे. धोनीने आयपीएल टीम चेन्नई सुपर किंग्जचा तीन विजेतेपदे मिळवून दिली आहेत. याशिवाय त्यांनी चॅम्पियन्स लीग टी-२०चे विजेतेपदही जिंकले आहे.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२१च्या १४व्या हंगामात धोनीचा चेन्नई सुपर किंग्ज संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. करोनामुळे आयपीएलचा यंदाचा हंगाम २९ सामन्यानंतर स्थगित करण्यात आला. मात्र आता उर्वरित ३१ सामन्यांचे आयोजन यूएईत १९ सप्टेंबरपासून होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2021 3:40 pm

Web Title: csk skipper ms dhonis new look goes viral adn 96
Next Stories
1 कडकच..! एक विकेट घेत दोन विक्रम नावावर करणारा गोलंदाज म्हणजे इशांत शर्मा
2 Euro Cup 2020: युक्रेन, ऑस्ट्रियाचं भवितव्य आजच्या सामन्यावर; कोण मारणार बाजी?
3 WTC Final Day 4 : चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे वाया