News Flash

हरभजन सिंहचे ४ कोटी उद्योगपतीने थकवले, पोलिसांत तक्रार दाखल

२०१५ साली हरभजनने दिली होती रक्कम

भारतीय संघाचा फिरकीपटू आणि आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिंग्जचं प्रतिनिधीत्व करणारा हरभजन सिंह पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काही दिवसांपूर्वी खासगी कारण देत हरभजनने स्पर्धेतून माघार घेतली होती. यानंतर चेन्नईमधील एका उद्योगपतीने हरभजनला ४ कोटींचा गंडा घातला आहे. गेली अनेक वर्ष या उद्योगपतीने हरभजनकडून घेतलेले पैसे परत दिले नसल्यामुळे अखेरीस हरभजनने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

२०१५ साली आपल्या एका मित्राच्या ओळखीने हरभजन जी. महेश या चेन्नईतील उद्योगपतीशी भेटला होता. यावेळी महेशच्या उद्योगासाठी हरभजनने ४ कोटी रुपये कर्ज स्वरुपात दिले होते. यानंतर हरभजन आपले पैसे परत मिळवण्यासाठी वारंवार महेश याच्या संपर्कात होता, परंतू प्रत्येक वेळी हरभजनच्या पदरी निराशाच पडली. गेल्या महिन्यात महेशने हरभजनला २५ लाखांचा चेक दिला. जो चेक खात्यात पुरेसे पैसे नसल्यामुळे बाऊन्स झाला. ज्यामुळे हरभजनने अखेरीस महेशविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान हरभजनने आपल्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर महेशने मद्रास उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. हरभजनकडून घेतलेल्या ४ कोटींच्या कर्जाच्या मोबदल्यात आपण थलंबूर येथील एका जागेची कागदपत्र तारण म्हणून हरभजनला दिली होती. सध्या चेन्नई पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2020 2:36 pm

Web Title: csk spinner harbhajan singh duped of rs 4 crore by chennai businessman files complaint psd 91
Next Stories
1 Video : धिप्पाड रखिम कॉर्नवॉलने करुन दाखवलं, मैदानात एका हाताने घेतला सुरेख झेल
2 जगातला सर्वोत्तम वन डे फलंदाज कोण? स्टीव्ह स्मिथ म्हणतो…
3 मुंबईकर पृथ्वी शॉ करतोय ‘या’ अभिनेत्रीला डेट?
Just Now!
X