News Flash

दीपिका कुमारीला कांस्य

अंताल्या, टर्की येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषकात दीपिका कुमारीने कांस्यपदकाची कमाई केली. महिला रिकव्‍‌र्ह प्रकारात दीपिकाने दक्षिण कोरियाच्या चांग ह्य़ू जिन वर ६-२ अशी मात

| June 1, 2015 01:54 am

अंताल्या, टर्की येथे सुरू असलेल्या तिरंदाजी विश्वचषकात दीपिका कुमारीने कांस्यपदकाची कमाई केली. महिला रिकव्‍‌र्ह प्रकारात दीपिकाने दक्षिण कोरियाच्या चांग ह्य़ू जिन वर ६-२ अशी मात करत दीपिकाने हे यश मिळवले.
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान ग्रहण केलेल्या दीपिकाच्या कामगिरीत गेल्यावर्षी प्रचंड घसरण झाली होती. जागतिक क्रमवारीत अव्वल तीनच्या बाहेर गेलेल्या दीपिकाची सातत्याने खराब प्रदर्शनामुळे भारतीय संघातही निवड होऊशकली नव्हती. मात्र हे सर्व बाजूला सारत दीपिकाने कसून मेहनत घेतली. तिरंदाजी विश्वचषकातील पदक दीपिकाच्या अविरत मेहनतीचे फळ आहे. तिरंदाजी विश्वचषकातले दीपिकाचे हे दुसरे पदक आहे. याआधी २०१३ मध्ये शांघाय येथे झालेल्या विश्वचषकात दीपिकाने रौप्यपदकाची कमाई केली होती.
रिओ ऑलिम्पिकच्या पाश्र्वभूमीवर, सर्वच भारतीय तिरंदाजपटूंचा सराव सुरू झाला आहे. लंडन ऑलिम्पिकमध्ये भारतीय तिरंदाजांकडून पदकाच्या अपेक्षा होत्या. मात्र ऐतिहासिक लॉर्ड्सवर मैदानावर सातत्याने वाहणारा वारा आणि अन्य परिस्थितीशी जुळवून घेता न आल्याने तिरंदाजांना रित्या हातानेच परतावे लागले होते. रिओ ऑलिम्पिकमध्ये हे चित्र बदलण्यासाठी तिरंदाजपटू सज्ज झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2015 1:54 am

Web Title: deepika kumari wins bronze in archery world cup
टॅग : Deepika Kumari
Next Stories
1 भारतीय कुस्तीपटूंना चार सुवर्ण; मुंबईकर नरसिंग यादव अव्वल
2 बॉक्सिंग इंडियाच्या कार्यकारिणीची १७ जून रोजी बैठक
3 रिअल माद्रिदच्या प्रशिक्षकपदी बेनिटेझ; उपाध्यक्षांचे स्पष्ट संकेत
Just Now!
X